शेखर सुमनचा सल्ला; कंगनाने तिचे तोंड बंद ठेवावे!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2017 9:32 AM
सध्या अभिनेत्री कंगना राणौत आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्यातील वाद बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. ‘कॉफी विद करण’च्या एका ...
सध्या अभिनेत्री कंगना राणौत आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्यातील वाद बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. ‘कॉफी विद करण’च्या एका एपिसोडमध्ये कंगनाने शोचा होस्ट करण जोहरवर घराणेशाहीचा आरोप लावताना त्याला ‘मूव्ही माफिया’ असे म्हटले होते. अर्थात ही सर्व चर्चा अनौपचारिक होती. मात्र आता या चर्चेने वेगळेच वळण घेतले असून, दोघेही एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नसताना दिसत आहेत. अशात आता अभिनेता आणि टीव्ही होस्ट शेखर सुमन याने या वादात उडी घेतली असून, कंगनाने तिचे तोंड बंद ठेवावे असा सल्ला दिला आहे. }}}} करणने कंगणाला इंडस्ट्रीमध्ये त्रास होत असेल तर तिने इंडस्ट्रीत काम करणे सोडून द्यावे असे म्हटले होते. त्यावर संतापलेल्या कंगनाने म्हटले होते की, मला इंडस्ट्री सोडण्याचा सल्ला देणारा करण कोण? बॉलिवूड म्हणजे करणला त्याच्या वडिलांनी दिलेला एखादा स्टूडिओ नव्हे, अशा शब्दात तिने त्याला सुनावले होते. त्यानंतर या दोघांचा वाद असा काही पसरला की, संपूर्ण बॉलिवूडमध्ये यावर चर्चा रंगू लागली. आता शेखर सुमनने यात उडी घेतली असून, त्याने कंगना तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे. शेखरने एका बॉलिवूड वेबसाइटशी बोलताना म्हटले की, कंगनाने तिचे तोंड बंद ठेवायला हवे. तसेच तिने अधिक व्यर्थ बडबड न करता आपल्या कामातून स्वत:ला सिद्ध करावे. जर तिला अयशस्वीतेचे दु:ख सलत असेल तर तिने पुढे जाण्याचा निर्णय घ्यायला हवा. कारण प्रत्येकवेळी छतावर उभे राहून जोरजोरात ओरडून मी काय आहे, हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे तोंड बंद ठेवणे हा यावरचा सर्वाधिक रामबाण उपाय असल्याचेही त्याने म्हटले. तसेच शेखर म्हणाला की, मला या रडणाºया महिला अजिबात आवडत नाहीत. कारण या त्यांच्या सोयीनुसार कधी तर कधी स्त्रीच्या भूमिकेत शिरत असतात. कारण जेव्हा समानतेचा मुद्दा समोर येतो, तेव्हा संगळ्यांनी एकाच रांगेत उभे राहायला हवे, असेही तो म्हणाला. या अगोदर शेखरने ट्विट करून, ‘कोकेनच्या आहारी गेलेली अभिनेत्री’ असा कंगनाचा उल्लेख केला होता. त्यानंतर शेखर आणि त्याचा मुलगा अध्ययन सुमन यांच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर गेल्या गुरुवारी शेखरने पुन्हा एक असेच निनावी ट्विट करीत केले. त्यात कोणाचा तरी गलिच्छ स्वभाव, फ्लॉप सिनेमे, फालतू अॅक्टिंग आणि घाणरडे लिखाण यावर भाष्य केलेले आहे. अर्थात हे ट्विटदेखील कंगनावरूनच केले गेले असावे, असा सध्या कयास लावला जात आहे. काही यूजर्सनी तर कंगनाचे नाव घेऊन शेखर सुमन प्रसिद्धी मिळवत असल्याचा त्याच्यावर आरोप केला आहे.