Ranveer Singh Nude Photoshoot Sherlyn Chopra Reaction: अतरंगी फॅशनमुळे चर्चेत राहणारा अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. काही लोकांनी त्याला पाठींबा दिला आहे तर काहींनी त्याला ट्रोल केलं आहे. प्रत्येकजण यावर व्यक्त होत आहे. रणवीरच्या या फोटोंना कुणी चांगलं म्हंटलंय तर कुणी ट्रोल करत त्याला चांगलंच सुनावलं आहे. आता अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरच्या फोटोशूटवर शर्लिनने ट्विट केलं आहे. ‘मी जेव्हा एका आंतरराष्ट्रीय मॅगझीनसाठी बोल्ड फोटोशूट केलं होतं तेव्हा लोकांनी मला चरित्रहीन, वाईट, बेअब्रू म्हणून हिणवलं होतं. आता मात्र या महाशयांनी फोटोशूट केलं तेव्हा हे उदूर्वूड आणि मीडिया यांच्या या कलेचं कौतुक करण्यात गुंग आहे. अरे भाई, आमच्या शरीरावर का किडे पडले होते का? हे असं दुटप्पी का वागता?,’ असं तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
शर्लिन चोप्रा ही तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओसाठी प्रसिद्ध आहे. ती आणि पूनम पांडेमध्ये सर्वाधिक सेक्सी अभिनेत्री कोण यावरून नेहमीच चढाओढ सुरू असते. दोघीही सोशल मीडियावर त्यांचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात. केवळ याच गोष्टीमुळे त्या दोघी प्रसिद्ध आहेत.