चित्रपटसृष्टीतील विविध कलाकार गेल्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकले आहेत. आता याच यादीत आणखीन एक अभिनेत्याचे नाव सामील होणार आहे. तो अभिनेता म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नसून तो आहे फरहान अख्तर. फरहान मॉडेल शिबानी दांडेकर हे दोघे सध्या रिलेशनशीपमध्ये आहेत आणि हे दोघे बऱ्याचदा एकत्र फिरताना दिसतात. याशिवाय ते दोघे एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर देखील करत असतात. दोघांनी जगासमोर आपले नाते स्विकारले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारे हे कपल आता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री आहे. दोघांच्या घरी लग्नाच्या तयारीला सुरूवातही झाली आहे. मात्र अद्याप लग्नाची तारिख समोर आलेली नाही. फरहानचे हे दुसरे लग्न असणार आहे.
फरहान अख्तरच्या पहिल्या पत्नीचे नाव अधुना होते. २००० मध्ये फरहान आणि अधुना विवाहबंधनात अडकले होते. पहिल्या पत्नीपासून फरहानला दोन मुली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार लग्न झालेला असतानाही फरहानचे कोणासोबत तरी अफेयर होते. याच कारणामुळे त्याचे लग्न तुटले. पहिली पत्नी अधुना हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर फरहान शिबानीच्या प्रेमात पडला.
फरहान व अधुनाचा संसार १५ वर्षे चालला. पण अचानक दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर लगेच फरहान व शिबानीच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली होती. आता हे कपल लग्न करणार म्हटल्यावर जीवनातील हा सुंदर आणि खास सोहळा आयुष्यभर लक्षात राहावा यासाठी दोघेही कोणतीही कसर सोडणार नाही हे मात्र नक्की.