अभिनेत्री शिखा मल्होत्राला गुरूवारी रात्री लकवा मारला. तिला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्री शिखा मल्होत्रा एक सर्टिफाइड नर्सदेखील आहे. कोरोना आणि लॉकडाउनदरम्यान मुंबईतील जोगेश्वरीतील हिंदू हृदय सम्राट ट्रॉमा सेंटरमध्ये एक नर्स म्हणून कोरोना रुग्णांची सेवा करत होती. एक नर्स म्हणून तिने सहा महिने रुग्णांची सेवा केली.
रुग्णालयात रुग्णांना सेवा देताना ऑक्टोबर महिन्यात तिला कोरोनाची लागण झाली होती आणि बरी झाल्यानंतर २२ ऑक्टोबरला तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. शिखाला लकवा मारल्याचे वृत्त देत शिखाचे कामकाज सांभाळणारी अश्विनी शुक्लाने एबीपी न्यूजला सांगितले की, घरी लकवा मारल्यानंतर पहिले शिखाला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल केले होते. शुक्लाने पुढे सांगितले की, रुग्णालयात उपचार महागडे असल्यामुळे नंतर तिला विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले.
ती चालण्या फिरण्याच्या अवस्थेतही नाही. मात्र डॉक्टरांचे म्हणणे आहे की शिखाची तब्येत आधीपेक्षा चांगली आहे.