बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेससोबत स्टाईल व फॅशन स्टेटमेंटने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. वाढत्या वयासोबत ती आणखीन सुंदर होत चालली. नेहमी फिटनेसमुळे चर्चेत राहणारी शिल्पा यावेळी महागड्या बॅगमुळे चर्चेत आली आहे. या बॅगेची किंमत वाचून तुम्ही हैराण व्हाल.
शिल्पा शेट्टी काही दिवसांपूर्वी मुंबई एअरपोर्टवर दिसली होती. यावेळी तिने ब्राउन रंगाच्या स्टायलिश आउटफीटमध्ये दिसली होती. मात्र यावेळी तिच्या हातातील बॅगेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. शिल्पाच्या हातातील ही बॅग हर्मेस बर्किन या ब्रॅण्डची असून ही बॅग खूप महागडी आहे. या बॅगेची किंमत जवळपास १० लाख रुपये पासून सुरु होते.
‘हंगामा २’ या चित्रपटात शिल्पा पुन्हा एकदा ‘चुरा के दिल मेरा’ या तिच्या सदाबहार गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. हे गाणे आधी शिल्पा आणि अक्षय कुमार यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. शिल्पा जितकी २५ वर्षांपूर्वी मोहक दिसत होती तशीच ती आजही मिझान जेफरीसोबत हे गाणे सादर करताना दिसत आहे अशी कपिलने शिल्पाची प्रशंसा केली.
त्यावर शिल्पा म्हणाली, ‘मैं खिलाडी तू अनाडी’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तिचा सहकलाकार मिझान याचा जन्मदेखील झाला नव्हता. मला त्याच्यासोबत काम करायचे आहे हे जेव्हा कळले तेव्हा त्याच्या एनर्जीसोबत मॅच करणे खूप कठीण असल्याची जाणीव मला झाली होती. तरीही मिझान आणि विशेषतः परेश रावल यांच्यासोबत काम करायला मजा आली.