बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ही जोडी येत्या काही दिवसांमध्ये लग्नगाठ (alia ranbir marriage) बांधणार असल्याचं सांगण्यात येत आहे. १४ ते १८ या कालावधीत आरके हाऊसमध्ये या जोडीचं लग्न होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे कलाविश्वातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यामध्येच अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (shilpa shetty) मात्र, याविषयी थक्क करणारी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या सोशल मीडियावर शिल्पाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात शिल्पाला पाहिल्यावर काही पापाराझींनी तिला रणबीर- आलियाच्या लग्नाविषयी प्रश्न विचारले. त्यावर शिल्पाने हसत हसत उत्तर दिलं. मात्र, तिच्या उत्तरामुळे उपस्थित सगळेच जण कन्फ्युज झाले.
त्यांच्या लग्नाविषयी मी काय बोलू? लग्न करतायेत तर करु दे ना. चांगली गोष्टी आहे. आणि, आधी लग्न होऊ तर दे, असं उत्तर शिल्पाने दिलं. दरम्यान, शिल्पा शेट्टीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. अलिकडेच शिल्पाने सिबलिंग्स डेच्या दिवशी बहीण शमिता शेट्टीसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओलाही नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली होती.