Join us

शिल्पा शेट्टीची आई रुग्णालयात; अभिनेत्रीची भावूक पोस्ट, म्हणाली, 'आईला असं पाहणं...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 4:46 PM

शिल्पाने आई आणि डॉक्टरांचा रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) आईला नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया पार पडली. शिल्पाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत माहिती दिली. या पोस्टमधून स्पष्ट होते की तिच्या आईवर झालेली सर्जरी यशस्वी झाली असून तिने भावूक होत पोस्ट लिहिली आहे.

शिल्पाने आई आणि डॉक्टरांचा रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्या छान हसताना दिसत आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, 'कोणत्याही लेकरांसाठी आई वडिलांवर शस्त्रक्रिया होताना पाहणे कधीही सोपे नसते. माझ्या आईकडून मला काही शिकायचे असेल तर ते तिचे धैर्य आणि तिची लढाऊ वृत्ती. गेले काही दिवस फारच चढउताराचे होते. माझी हिरो आणि माझ्या हिरोच्या हिरोला यश आले.'

पुढे शिल्पा म्हणाली, 'शस्त्रक्रियेच्या अगोदर आणि नंतर माझ्या आईची इतकी चांगली काळजी घेतल्याबद्दल डॉ राजीव भागवत यांचे खूप खूप आभार. तसंच नानावटी रुग्णालय आणि त्यांच्या स्टाफचे सहकार्याबद्दल आभार…'

शिल्पाच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी आई लवकर बरी होऊ दे अशी प्रार्थना केली आहे. फराह खान, दिया मिर्झा, रवीना टंडन  यांनी कमेंट करत शिल्पाला धीर दिला आहे. 

टॅग्स :शिल्पा शेट्टीबॉलिवूडपरिवारहॉस्पिटल