बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. कारण आहे, शिल्पाचा पती राज कुंद्रा ( Raj Kundra) याची एक्स-वाईफ कविताचा एक व्हिडीओ. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओ कविताने शिल्पा शेट्टीवर तिचा संसार मोडल्याचा धक्कादायक आरोप केला. यानंतर राज कुंद्राने समोर येत एक्स वाइफ कविताबद्दल असा काही धक्कादायक खुलासा केला, की सगळेच हैराण झालेत. शिल्पा शेट्टीने मात्र यावर मौन बाळगले होते. पण आता थेट नाही पण अप्रत्यक्षपणे का होईना, शिल्पाने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.शिल्पाने तिच्या इन्स्टा अकाऊंटच्या स्टोरीवर एका पुस्तकाच्या पानाचा फोटो शेअर केला आहे.या पानांवरचा उतारा हाच कविताला उत्तर असल्याचे मानले जात आहेत.
‘जेव्हा एका चांगल्या व्यक्ति दुखावतो, तेव्हा त्याच्यासोबत जुळलेल्या सर्वच चांगल्या व्यक्तींना वेदना होतात. चांगुलपणा नेहमी चांगल्या कामात योगदान देतो. म्हणूनच एखाद्या चांगल्या कामाला उशीर होतो किंवा ते पूर्ण होत नाही, तेव्हा सर्वांना दु:ख होतं. अनेकदा चांगल्या लोकांसोबतच वाईट घडताना आपण ऐकतो किंवा पाहतो आणि यामुळे आपण काहीही करत नाही. पण जेव्हा एका चांगल्या व्यक्तिवर हल्ला होतो, त्याला जखमी केले जाते, त्याला अटक होते, त्याच्यावर अत्याचार होतो किंवा त्याचा जीव जातो, तेव्हा आपण सर्व वाटतो तेवढे सुरक्षित नाही, असे जाणवायला लागते,’ असे पुस्तकातील या उताºयात लिहिले आहे.राज कुंद्रा आणि कविताचे 2003 मध्ये लग्न झाले होते. 2006 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर काही वर्षांनी राजने राजने शिल्पा शेट्टीशी लग्न केले. या दोघांना विहान आणि समीशा अशी दोन मुलं आहेत.
व्हिडीओ व्हायरलअलीकडे शिल्पा शेट्टीचा वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसाच्या काही दिवसांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात राज कुंद्राची एक्स-वाईफ कविता हिने शिल्पावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. शिल्पामुळे माझा संसार मोडला, असा आरोप तिने या व्हिडीओत केला आहे.
राजने केले अनेक धक्कादायक खुलासेहा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजने पहिल्या पत्नीबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत त्याने असा व्हिडीओ व्हायरल होणे हे फारच दु:खद असल्याचे म्हटले. या माध्यमातून आमची सर्वांचीच प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी 12 वर्ष काहीच न बोलता शांत राहिलो पण आता नाही. मला हा व्हिडीओ पाहिल्यावर खूप राग आला होता. शिल्पाने याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले पण मी आता बोलण्याचा निर्णय घेतला आहे. कविताचा जो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ती मुलाखत देण्यासाठी कविताला पैसे देण्यात आले होते. आमचा घटस्फोट होत असताना मी तिच्याकडे बँक स्टेटमेंट मागितले होते. त्यात या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख होता की, एका न्यूजपेपरने अशाप्रकरच्या या मुलाखतीसाठी तिला पैसे दिले होते. ती एका सेलिब्रेटीवर स्वत:चा संसार मोडल्याचा आरोप करत आहे. पण घटस्फोटासाठी कविता एकटी जबाबदार आहे. कविता लंडनमध्ये होती तेव्हा तिचे माझ्याच बहिणीच्या नव-यासोबत अफेअर सुरू होते. मी बिझनेस ट्रीपसाठी बाहेर गेल्यावर ती त्याच्यासोबत वेळ घालवत असे. माझ्या ड्रायव्हरलाही हे माहीत होते. त्याने मला हे सांगण्याचा प्रयत्नही केला पण मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. मी शिल्पाला भेटल्यावर एक्स वाइफने माझ्यावर घटस्फोटासाठी दबाव आणायला सुरुवात केली. तिने शिल्पावर खोटे आरोप करत पैशांच्या मोबदल्यात युकेतील एका टॅब्लॉइडला ही स्टोरी विकली. घटस्फोटादरम्यान पोटगीपोटी मला कोट्यवधीची रक्कम तिला द्यावी लागली. तिने मला माझ्या मुलीपासून दूर केले, असे राज या मुलाखतीत म्हणाला.