Join us

​ शिल्पा शेट्टी ‘आई’ होण्यास तयार !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2016 3:36 PM

शिल्पा शेट्टी दुसºयांदा आई होणार की काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण तसले काहीही नाहीय. शिल्पा आई बनण्यास ...

शिल्पा शेट्टी दुसºयांदा आई होणार की काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण तसले काहीही नाहीय. शिल्पा आई बनण्यास तयार आहे. पण रिअल लाईफमध्ये नाही तर रील लाईफमध्ये. खरे तर अनेक नट्या चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारण्यास कचरतात. पण शिल्पा मात्र पडद्यावर आईची भूमिका साकारण्यास अगदी तयार आहे. एका मुलाखतीत खुद्द शिल्पानेच ही बाब स्पष्ट केली. खºया आयुष्यात मी आई आहे. अशास्थितीत पडद्यावर आईची भूमिका साकारण्यात मला काहीही अडचण नाही. अर्थात असा कुठला प्रस्ताव आलाच तर त्यासाठी माझ्याजवळ वेळ असायला हवा. मी सध्या माझ्या मुलाच्या संगोपनात व्यस्त आहे. माझा मुलगा हाच माझी प्राथमिकता आहे. माझ्या मनासारखे होत असेल तर पडद्यावर आई बनणेही मला आवडेल, असे शिल्पा एका मुलाखतीत म्हणाली. सध्या शिल्पा छोट्या पडद्यावर ‘सुपर डान्सर’ या रिअ‍ॅलिटी डान्स शो जज करताना दिसते आहे. २००८ मध्ये करण जोहरच्या ‘दोस्ताना’ या चित्रपटातील एका आयटम नंबरमध्ये ती अखेरची दिसली होती. त्यानंतर गत आठ वर्षांपासून ती मोठ्या पडद्यापासून दूर आहे.