शिल्पा शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून सिल्वर स्क्रिनपासून लांब आहे. मात्र ती छोट्या पडद्यावर अॅक्टिव्ह असते. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'शी बोलताना शिल्पाने तिच्या स्ट्रगलिंगच्या दिवसातील काही आठवणी शेअर केल्या. शिल्पा म्हणाली,'' मी उंच, बारीक आणि काळी होती. मी ग्रॅज्युएशन केल्यानंतर माझ्या वडिलांसोबत काम करत होते. मला काही तरी वेगळे आणि चांगलं करायचे होते. एकदा मस्तीमध्ये मी एक फॅशन शोमध्ये सहभाग घेतला. त्या दरम्यान माझी ओळख एक फोटोग्राफरशी झाली ज्याला माझे फोटो काढायचे होते. माझे जे फोटो काढण्यात आले ते पाहुन मी हैराण झाले. मी करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली. मात्र सगळं काही सहजतेने मिळत नाही. मी फक्त 17 वर्षांची होती जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रित पाऊल ठेवले. मला हिंदीत नीट बोलता पण येत नव्हते.''
एकेकाळी शिल्पाला बॉलिवूडमध्ये 'या' वाईट गोष्टींचा करावा लागला होता सामना, स्वत: केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 12:07 IST
शिल्पा शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून सिल्वर स्क्रिनपासून लांब आहे. मात्र ती छोट्या पडद्यावर अॅक्टिव्ह असते. शिल्पाने तिच्या स्ट्रगलिंगच्या दिवसातील काही आठवणी शेअर केल्या
एकेकाळी शिल्पाला बॉलिवूडमध्ये 'या' वाईट गोष्टींचा करावा लागला होता सामना, स्वत: केला खुलासा
ठळक मुद्देशिल्पाने करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केलीशिल्पाने 'बाजीगर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले