Join us  

15 वर्षानंतर शिल्पाला मिळाली ‘माफी’! रिचर्ड गेअरसोबतच्या ‘त्या’ किस प्रकरणातून अखेर सुटली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 3:01 PM

Shilpa Shetty-Richard Gere Kissing Case : काय आहे प्रकरण? काय घडलं होतं 'त्या' दिवशी? कोर्टाने काय दिला निकाल?

Shilpa Shetty-Richard Gere Kissing Case : : सन 2007 मध्ये शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty )राजस्थानातील एका कार्यक्रमात सहभागी झाली होती.  हॉलिवूड स्टार रिचर्ड गेअर (Richard Gere ) हा सुद्धा या कार्यक्रमात हजर होता. या इव्हेंटमध्ये रिचर्डने शिल्पाला पब्लिकली किस केलं होतं. हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. यानंतर शिल्पाविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता  पसरवल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता 15 वर्षानंतर  कोर्टाने याप्रकरणी शिल्पाला दिलासा देत, तिला या आरोपातून मुक्त केलं आहे.

पोलिसांचा अहवाल आणि सादर   कागदपत्रांचा आधारावर न्याय दंडाधिकारी केतकी छवन यांनी शिल्पाला दिलासा दिला. शिल्पा ही या प्रकरणातील आरोपी नाही तर पीडिता होती. रिचर्डसाठी ती एक एलिमेंट होती, म्हणून हे सगळं प्रकरण घडलं होतं. तिचा यात काहीही दोष नव्हता. त्यामुळे तिला या आरोपातून मुक्त करण्यात येत आहे, असं कोर्टाने यावेळी स्पष्ट केलं.

2007 मध्ये घडलेल्या या किस प्रकरणानंतर  राजस्थानमध्ये दोन आणि गाझियाबादमध्ये अश्लीलतेच्या आरोपाखाली एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2017 मध्ये हे प्रकरण मुंबईला हस्तांतरित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती.   काय आहे प्रकरण2007 मध्ये शिल्पा शेट्टीने एड्स जनजागृतीसाठी आयोजित इव्हेंटमध्ये भाग घेतला होता.  या कार्यक्रमात अभिनेता रिचर्ड गेअरही गेस्ट होता. शिल्पा रिचर्डला स्टेजवर घेऊन आली आणि अचानक रिचर्ड  शिल्पाच्या हातावर किस करू लागला. तो इथेच थांबला नाही तर त्याने काही क्षणानंतर शिल्पाला मिठीत घेत, तिच्या गालावर   किस केलं होतं. याचा व्हिडीओवरून मोठा वाद झाला होता. ठिकठिकाणी शिल्पा व रिचर्डविरोधात निदर्शने झाली होती. एका कोर्टाने शिल्पाविरोधात  अटक वॉरंट जारी केला होता. 

टॅग्स :शिल्पा शेट्टीबॉलिवूड