‘सुपर डान्सर चॅप्टर ४' मध्ये शिल्पा शेट्टी जजच्या भूमिकेतून छोट्या पडद्यावर झळकत आहे. बच्चे कंपनीने सादर केलेले एक से बढकर एक परफॉर्मन्स पाहून नेहमीच आश्चर्यचकीत होत असते. आगामी भाग खूप स्पेशल असणार आहे. बॉलिवूडमधील तिच्या काही खास आठवणींचे किस्से ती चाहत्यांसोबत शेअर करणार आहे. १९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बाजीगर’ सिनेमात काजोल, शाहरुख आणि शिल्पा शेट्टी यांच्या भूमिका होत्या.याविषयी तिने खास किस्सा सांगितला.
आगामी भागात स्पर्धक नीरजाने 'ये काली काली आँखे' यावर डान्स करताना पाहायला मिळणार आहे. या गाण्यावर निरजाने ठेका धरताच शिल्पा मात्र जुन्या आठवणीत रमली. ‘बाजीगर’ या सिनेमातील ‘ये काली-काली आंखे’ हे गाणे प्रचंड हिट ठरले होते. हे गाणे शाहरुख आणि काजोल यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. मात्र शिल्पाला त्यावेळी हे गाणे करायचे होते. जेव्हा जेव्हा मी हे गाणे पाहायची तेव्हा तेव्हा मला खूप वाईट वाटायचे. त्यामुळे २८ वर्षानंतर गाणे ऐकून पुन्हा एकदा तो किस्का शिल्पाला आठवला आणि आजही या गाण्यावर डान्स करण्याची ईच्छा पूर्ण झाली नसल्याची खंत तिला वाटते.
शिल्पाचा पहिला सिनेमा 'बाजीगर' होता.पहिलाच सिनेमा असल्याने ती शूटिंगदरम्यान प्रचंड घाबरलेली होती.शूटिंगवेळी तिला अनेक अडचणी यायच्या. शिल्पाची अवस्था पाहून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने तिला मदत केली होती. सेटवर सतत तिच्याकडून चुका होत असल्यामुळे अनेक लोकं तिच्यावर आधीच वैतागले होते. 'ए मेरे हमसफर' या पहिल्या गाण्याचं शूटिंगदरम्यान तर तिच्याकडून लिंपसिंक होत नव्हते. यावेळी तिला लिपसिंक करायला शाहरुखनेच शिकवले होते. विशेष म्हणजे या सिनेमाच्या वेळी शिल्पा फक्त १७ वर्षांची होती. कॅमेरा कसा फेस करायचा अशा कोणत्याच गोष्टी तिला माहित नव्हत्या त्यामुळे सीन शूट करताना अनेकदा ती गोँधळायची. शाहरुखनेच तिला कॅमेरा फेस कसा करायचा याविषयी खास टीप्स दिल्या होत्या. शाहरुखने दिलेल्या आधारामुळेच ती मोठ्या आत्मविश्वासाने पुढे काम करु लागल्याचे सांगते.