बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती बिझनेसमन राज कुंद्रा (Raj Kundra) विरोधात क्राइम ब्रांचमध्ये पॉर्नोग्राफीची केस दाखल करण्यात आली होती. तुरूंगात ३ महिने घालवल्यानंतर त्याला जामीन देण्यात आला होता. त्यानंतर राज कुंद्रा मीडियासमोर येण्यास टाळत होता. सोबतच सोशल मीडियावरही राज कुंद्रा काही पोस्ट करत नव्हता.
अशात राज कुंद्राने काही दिवसांपूर्वी याप्रकरणी आपलं मौन सोडत स्पष्टीकरण दिलं होतं. ज्यावरून आता त्याची पत्नी शिल्पा शेट्टी त्याच्या सपोर्टमध्ये समोर आली आहे. आपल्या ट्विटर हॅंडलवर विंस्टन चर्चिल यांचं एक वाक्य ट्विट केलं. ते असं होतं की, 'सत्य कधीही बदललं जाऊ शकत नाही. कदाचित सत्य तुला माहीत नसेल, पण शेवटी सत्य समोर येतंच'.
राज कुंद्रा म्हणाला होता, मला फसवलं गेलंय
सोमवारी म्हणजे २० डिसेंबरला राज कुंद्राने स्पष्टीकरण देत सांगितलं होतं की, त्याला मुद्दाम यात फसवण्यात आलं आहे. आणि मीडियाने त्याच्या विरोधात इतक्या बातम्या छापल्या, त्यांनी पहिल्याच स्टेटमेंटमध्ये मला दोषी ठरवलं. बऱ्याच वक्तव्यानंतर मी मौन सोडलं आहे. पण अनेकांनी माझ्या गप्प बसण्याला माझी कमजोरी समजलं होतं'.
राज कुंद्रा म्हणाला होता की, 'मी कधीही पॉर्नोग्राफीमध्ये सहभागी झालो नाही. यात मला अडकवण्यात आलं आहे. हे प्रकरण फारच गंभीर आहे म्हणून मी काहीही स्पष्ट करू शकत नाही. पण मी केस लढण्यासाठी तयार आहे. सोबतच मला आपल्या न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे.