Join us

Shilpa Shetty Video : अरे तुम्ही वेडे झालात का? शिल्पाची अतरंगी जीन्स पाहून संतापले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 13:39 IST

Shilpa Shetty Video : काल 5 डिसेंबरला मनीष मल्होत्राचा वाढदिवस झाला. यावेळी जंगी पार्टी रंगली. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी या पार्टीला हजेरी लावली. पण सर्वाधिक चर्चा झाली ती शिल्पा शेट्टीची...

मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) बॉलिवूडचा दिग्गज फॅशन डिझाईनर आहे. बॉलिवूडच्या बाला त्याने डिझाईन केलेले कपडे घालून मिरवण्याची एकही संधी सोडत नाहीत. काल 5 डिसेंबरला मनीष मल्होत्राचा वाढदिवस झाला. यावेळी जंगी पार्टी रंगली. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी या पार्टीला हजेरी लावली. पण सर्वाधिक चर्चा झाली ती शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty).

होय, शिल्पा या पार्टीत अशा काही अवतारात पोहोचली की, लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. शिल्पा शेट्टीचा पार्टीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिची जबरदस्त खिल्ली उडवली. अनेकांनी तिची तुलना उर्फी जावेदशी केली.

शिल्पा बहिण शमितासोबत पार्टीत पोहोचली. यादरम्यान शिल्पावर सर्वांच्या नजरा खिळल्या.  तिची अतरंगी  जीन्स पाहून सगळेच हैराण झालेत. 

‘बास्स करा यार, पागल होऊ आम्ही हे सगळं पाहून, आता तर हद्दच झाली,’ अशी कमेंट एका युजरने केली. एका युजरने तर शिल्पाची जीन्स डिझाईन करणाऱ्या डिझाईनरला चक्क श्रद्धांजली वाहिली. ‘यार, हे श्रीमंत लोक वेडे होतात का?’, अशी कमेंट एका युजरने केली. ‘ही तर उर्फीच्याही एक पाऊल पुढे निघाली,’ असं एकाने लिहिलं.

शिल्पा शेट्टी ही कोट्यावधी संपत्तीची मालकीण आहे. एका सिनेमासाठी ती 1 ते 2 कोटी रुपये मानधन आकारत होती. टीव्हीवरील रिअ‍ॅलिटी शो जज म् करण्यासाठी शिल्पा शेट्टी एपिसोडप्रमाणे 17 ते 18 लाख मानधन घेते.  सिनेमांशिवाय जाहिराती आणि ब्रँड एन्डॉर्समेंटही आहेत. अलिशान आयुष्य जगणारी  शिल्पा शेट्टी एकूण 134 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.  

टॅग्स :शिल्पा शेट्टीमनीष मल्होत्राबॉलिवूड