बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान व बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात दोन मोठे जहाज वापरण्यात येणार असल्याचे समजते आहे. यशराज प्रोडक्शनने दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटासाठी दोन मोठ्या जहाचांची निर्मिती केली जात आहे. एवढेच नाही तर हे काम खूप पुर्वीच झाले होते. या जहाजांचे वजन जवळपास 2 लाख किलो असणार आहे.रिपोर्टनुसार जहाज तयार करण्यासाठी 1000 पेक्षा जास्त कामगार काम करत होते. हे आंतरराष्ट्रीय डिझायनरच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. ठग्स ऑफ हिंदोस्तान यश राज बॅनरचा आतापर्यंत सर्वात मोठा चित्रपट असणार आहे. चित्रपटाचे बजेट 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विज कृष्ण आचार्य करत आहेत. त्यांनी आमीरसोबत 'धूम 3' चित्रपट बनवला होता.
'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटात समुद्री लुटारुची कथा दाखवण्यात आली असून आमीर खान आणि अमिताभ बच्चनसोबत कतरिना कैफ आणि दंगल गर्ल फातिमा सना शेखही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2018 ला प्रदर्शित होऊ शकतो. मात्र अद्याप प्रदर्शनाच्या अधिकृत तारखेची घोषणा केलेली नाही. या चित्रपटासाठी सर्व कलाकारांना तरवारबाजी, घोडेस्वारी आणि भाला युद्धाची चार महिने ट्रेनिंग देण्यात आले आहे. आमीर खानचे दोन महिन्यांचे शेड्यूल होते. यासोबतच अमिताभ बच्चन यांनी दोन आठवड्याची ट्रेनिंग घेतली आहे. सेटवर उपस्थित लोकांनी सांगितले की, चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी स्वतः जास्तीत जास्त स्टंट स्वतः केले आहेत. 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटातील कलाकारांचे लूक व 2 लाख किलो वजन असणाऱ्या जहाजाबद्दल जाणून घेतल्यानंतर रसिकांची उत्कंठा आणखीन वाढली आहे.