Join us

Video: शोएब मलिकच्या तिसऱ्या बायकोला आला राग, जेव्हा प्रेक्षकांनी घेतलं सानिया मिर्झाचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 4:47 PM

पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने (Shoaib Malik) काही दिवसांपूर्वी तिसरं लग्न करत सर्वांनाच धक्का दिला होता. त्याची दुसरी पत्नी आणि भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania Mirza) गेल्या काही महिन्यांपूर्वीच शोएबपासून 'खुला' म्हणजेच 'तलाक' घेतला. यानंतर फक्त भारतच नाही तर पाकिस्तानातील जनतेनेही सानियाची बाजू घेतली आणि शोएबवर सणकून टीका केली.  नुकतंच शोएबची तिसरी पत्नी सना जावेद (Sana Javed) पतीला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमवर आली असता तिच्यासमोर प्रेक्षकांनी सानिया मिर्झाच्या नावाचा कल्ला केला. तेव्हा सनाची रिअॅक्शन बघण्यासारखी होती.

सोमवारी पाकिस्तान सुपर लीगमध्ये मुलतान सुलतान आणि कराची किंग्स यांच्यात सामना होता. कराची किंग्स कडून खेळत असलेल्या आपल्या पतीला पाठिंबा देण्यासाठी सना जावेद उपस्थित होती. शोएब मलिकने दमदार खेळी करत 53 धावा केल्या . मात्र शोएबची टीम मॅच जिंकू हरली. स्टेडियममध्ये बसलेल्या सना जावेदचे फोटो तुफान व्हायरल झाले. आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये सना जावेद ब्लॅक स्वेटशर्ट आणि ब्लू जीन्समध्ये सुंदर दिसत आहे. स्टेडियममधून बाहेरच्या दिशेला जात असताना काही प्रेक्षक तिचा व्हिडिओ घेत होते. तेव्हा एक जण जोरजोरात सानिया मिर्झा, सानिया मिर्झा नावाने ओरडायला लागला. सना जावेदने आधी दुर्लक्ष केलं मात्र नंतर तिने मागे वळून रागातच एक लूक दिला. तिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.

शोएब आणि सानिया मिर्झाचा संसार मोडल्याचा सना जावेदवर आरोप होतोय. शोएबशी लग्न करताच सर्वांनीच तिला धारेवर धरलं आहे.'अखेर एका गोष्टीवर भारत पाकिस्तान एकाच टीममध्ये आले','काम असं करा की सगळे धर्म मिळून शिव्या देतील' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

सना जावेद पाकिस्तानची लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. हे तिचंही दुसरं लग्न आहे. सना आणि शोएब गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. शोएबने सानियाचा विश्वासघात करत सनासोबत नातं सुरु केलं होतं. शोएब आणि सानियाला एक मुलगाही आहे. मुलाच्या कस्टडीवरुन आता काय निर्णय येतो हे बघणं महत्वाचं आहे.

टॅग्स :शोएब मलिकसानिया मिर्झापाकिस्तानसोशल मीडियाट्रोल