Join us  

​शोभा डे यांची पुरती ‘शोभा’; मुंबई पोलिसांची खिल्ली उडवणे उलटले अंगावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2017 5:48 AM

नामवंत लेखिका शोभा डे यांनी पुन्हा एकदा twitterच्या माध्यमातून नवा वाद ओढवून घेतला आहे. यावेळी शोभा डे यांनी थेट ...

नामवंत लेखिका शोभा डे यांनी पुन्हा एकदा twitterच्या माध्यमातून नवा वाद ओढवून घेतला आहे. यावेळी शोभा डे यांनी थेट मुंबई पोलिसांना लक्ष्य केले. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनीही डे बाईंना तेवढेच चोख प्रत्युत्तर दिले. काल मंगळवारी शोभा डे यांनी त्यांच्या twitter अकाऊंटवरून बंदोबस्तावर तैनात असलेल्या एका वर्दीतील पोलिस कर्मचा-याचे छायाचित्र  tweet  केले. हे tweet संबंधित पोलिस कर्मचाºयावर शारीरिक टिप्पणी करणारे होते. ‘हेवी पोलिस बंदोबस्त इन मुंबई टुडे...’ असे tweet त्यांनी केले होते. त्यांच्या या tweet मधून संबंधित पोलिस कर्मचा-याची खिल्ली उडवली गेली होती. खरे तर मुंबई पोलिसांच्या कर्मचा-यांचे वाढलेल्या वजनावर यापूर्वी अनेकदा चर्चा झाली आहे. पण शोभा डे यांनी आपल्या tweetमधून मुंबई पोलिसांची पुरती ‘शोभा’ केली. त्यांची ही ‘गंमत’ त्यांच्यावरच उलटली. शोभा डे यांचे हे tweet २०० पेक्षा अधिकवेळा retweet केले गेले. सोबतच पाचशेवर लोकांनी त्याला लाईक केले. पण अनेकांनी यावर टीकाही केली. आपलं हसू झालेलं बघून मुंबई पोलिसांनी डे बार्इंची चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. ‘विनोद आम्हालाही आवडतात. मात्र याठिकाणचा संदर्भ पुरता चुकीचा आहे. छायाचित्रातील कर्मचा-याने घातलेला गणवेश हा मुंबई पोलिसांचा नाही. आम्हाला तुमच्यासारख्या जबाबदार नागरिकाकडून बºयाच अपेक्षा आहेत,’अशा शब्दांत मुंबई पोलिसांनी डे बार्इंना सुनावले. कदाचित शोभा डे यांनाही अशा उत्तराची अपेक्षा नसेल. मग काय, अनेकांनी डे यांना ‘गप्प’ केल्याबद्दल मुंबई पोलिसांची पाठ थोपटली. मुंबई पोलिस स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी ठामपणे उभे राहिले, त्यांना सलाम, अशा tweetची मग गर्दी झाली.यापूर्वी रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंसंदर्भात शोभा डे यांनी असेच वादग्रस्त tweet केले होते. यामुळे त्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. रिओला जाऊन सेल्फी काढायचे आणि खाली हातांनी परतायचे, हेच भारतीय खेळाडूंचे रिओ आॅलिम्पिकमधील लक्ष्य आहे. भारतीय खेळाडू पैसा आणि संधी दोन्हीचा अपव्यय करत आहेत, असे डे यांनी म्हटले होते. त्यानंतर अनेक क्रीडापटू आणि सेलिब्रिटींनी डे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.  पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक यांनी भारतासाठी पदक मिळवले तेव्हा अमिताभ बच्चन, वीरेंद्र सेहवाग आदींनी शोभा डे यांना खडेबोल सुनावले होते.