चित्रपटसृष्टीत दिवसागणिक नाती कशी बदलतात हे सांगणं कठीण. आज रिलेशनशिपमध्ये असणारे कपल उद्या एकत्र दिसतीलच असं नाही. त्यामुळेच कितने अजीब रिश्ते है यहाँ पे या गाण्याच्याओळी सेलिब्रिटींसाठी तंतोतंत लागू पडतात. असं काहीसं बॉलिवूड अभिनेता अरुणोदय सिंह आणि कॅनडाची रहिवाशी असलेली ली एल्टन यांच्या नात्याविषयी म्हणावे लागेल. १३ डिसेंबर 2016 मध्ये दोघांचे लग्न झालं होते.
लग्नाच्या काही दिवसांतच दोघांमध्येही वाद होऊ लागले.दिवसेंदिवस या दोघांमध्ये खटके उडू लागले. तीन वर्षांच्या आतच त्यांच्यावर घटस्फोट घेण्याची वेळ आली असून या दोघांनी आपल्या नात्याला पूर्णविराम देण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे या दोघांचे वाद अगदी छोट्या छोट्या कारणांमुळे होत असायचे.
हीच छोटी छोटी कारणं पुढे मोठी होत गेले. दोघांमध्येही दुरावा निर्माण झाला. घटस्फोट घेण्यालालाही अगदी छोटं कारण समोर आले आहे. एल्टन आणि अरुणोदय या दोघांच्याही कुत्र्यांची लढाई झाली.
कुत्र्यावरून सुरू झालेला वाद या दोघांनी पर्सनली घ्यायला सुरूवात केली त्यानंतर दोघांमध्येही वाद वाढत गेले. याशिवाय अरुणोदयने एल्टनवर अनेक गंभीर आरोपही लावले आहेत.तुर्तास अरूणोद्यच घटस्फोट देण्यासाठी फोर्स करत असल्याचे समोर आले आहे.
एल्टनने याविषयी तक्राकर दाखल केली आहे. त्यामुळे पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला होणार आहे. अरूणोदय आणि एल्टन दोघांची भेट गोव्यात झाली होती. तिथून त्यांची मैत्रीला सुरूवात झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघेही एकमेकांना डेट करू लागले. दोघांच्या आवडी- निवडी जुळल्यानंतर लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता.
अतिशय थाटात दोघांचे लग्न पार पडले होते. अरूणोद्यने न्यूयॉर्क फिल्म अकाडमीमधून, ब्राण्डैस युनिर्व्हसिटीमधून अभिनयाचे धडे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर करिअरच्या सुरूवातीला अरूणोदयने 'आएशा', 'ये साली जिंदगी', 'जिस्म 2', 'मैं तेरा हीरो', 'बुद्धा इन अ ट्रैफिक जाम', 'मोहनजोदाड़ो' आणि 'ब्लैकमेल' सारख्या सिनेमात तो झळकला आहे. नुकताच अरूणोदय वेब सीरिज 'अपहरण' मध्येही झळकला होता.
लग्नानंतर अरूणोदय खारमध्ये एका फ्लॅट घेतला दोघेही तिथे एकत्र राहत होते. लग्नाच्या चार वर्षानंतर दोघांच्या नात्यात वादाची ठिणगी पडली. दोघांचे छोट्या छोट्या कारणामुळे बिनसले आणि आता हा वाद थेट घटस्फोटापर्यंत पोहचला आहे.