Join us  

SHOCKING : सेक्स रॅकेटमध्ये अडकल्या ‘या’ अभिनेत्री !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2017 10:27 AM

-Ravindra Moreअभितेत्री श्वेता बसु प्रसाद एका सेक्स रॅकेटमध्ये सापडली होती, हे आपणास माहित आहेच. विशेष म्हणजे श्वेता बसु ...

-Ravindra Moreअभितेत्री श्वेता बसु प्रसाद एका सेक्स रॅकेटमध्ये सापडली होती, हे आपणास माहित आहेच. विशेष म्हणजे श्वेता बसु प्रसादला सर्वश्रेष्ठ बाल कलाकार म्हणून राष्ट्रीय फिल्म पुरस्कारदेखील मिळाला आहे. पोलिस अधिकाºयांनी बंजारा हिल्स परिसरात एका हॉटेलमध्ये छापा मारून देह विक्री व्यवसायाचा भंडाफोड केला होता. यात सहभागी असलेल्या या तेलगु अभिनेत्रीने पोलिसांना सांगितले होते की, चित्रपटात काम नाही आणि पैशांच्या कमतरतेमुळे या व्यवसायात आले. तेलगु अभिनेत्री ज्योतीला एका सेक्स रॅकेटमध्ये तिचा काही अंशी सहभाग असल्या कारणाने अटक करण्यात आली होती. २३ आॅगस्ट २०१० मध्ये हैदराबाद पोलिसांनी स्प्रिंग स्वर्ग अपार्टमेंटमध्ये या रॅकेटचा भंडाफोड केला होता.तेलगू अभिनेत्री सायरा बानोलादेखील एका सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याकारणाने अटक करण्यात आली होती.तेलगु टिव्ही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रवणीला आॅक्टोबर २०१३ मध्ये एका हायप्रोफाइल सेक्स रॅकेटमध्ये रंगेहात पकडण्यात आले होते. विशेष आॅपरेशन टास्क फोर्सने एका घरात छापा मारला आणि श्रवणीला पकडले होते. टास्क फोर्सने तिच्या जवळील सुमारे २ लाख रुपयेदेखील जप्त केले होते.प्रसिद्ध अभिनेत्री यमुनाला जानेवारी २०११ मध्ये बॅँगलोरमध्ये विठ्ठल माल्यारोडालगत स्थित एका हॉटेलमध्ये एका सेक्स रॅकेटशी संबंध असल्याकारणाने अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे अभिनेत्री यमुनाचे ग्राहक मुंबई आणि दिल्लीहून तेथील फाइव्ह स्टार हॉटेलमधून येत होते.   ‘लाइफ की तो लग गई’ या बॉलिवूड चित्रपटाद्वारे करिअरची सुरुवात करणारी बंगाली अभिनेत्री मिष्टी मुखर्जीला मुंबई पोलिसांनी देहविक्र ीच्या आरोपामुळे अटक केली होती. पोलिसांच्या छाप्यात मिष्टी दिल्लीच्या एका फॅशन डिझायनर राकेश कटोरियासोबत नको त्या अवस्थेत आढळली होती. ओशिवार स्थित मीरा टॉवरच्या १५ व्या मजल्यावर स्थित तिच्या अलिशान फ्लॅटमध्ये अश्लिल चित्रपटांच्या सुमारे एक लाख सीडी आणि डिव्हीडीदेखील सापळल्या होत्या. प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री भुवनेश्वरीला वेश्याव्यवसायाशी संबंधीत प्रकरणामुळे चेन्नई पोलिसांनी अटक केली होती. तिच्या सोबत यावेळी दोन युवा मॉडल्सदेखील होते. आॅक्टोबर २००९ मध्ये अभिनेत्री भुवनेश्वरीच्या शेजाºयांनी पोलिसांना सुचना दिली होती की, रात्री-बेरात्री तिच्या घरी लोकांचे येणे-जाणे असते.  पोलिसांच्या छाप्यात असे आढळले की, भुवनेश्वरीने कॉलीवूड आणि टॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनादेखील या व्यवसायात आणले होते. ती एक बोल्ड आणि हॉट अभिनेत्रीम्हणून प्रसिद्ध होती.