Join us

धक्कादायक! चालू शूटींगमध्ये कोसळला अभिनेता, मदत न मिळाल्यामुळे झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 1:38 PM

गेल्या काही महिन्यांपासून सेलेब्रेटींच्या निधनामुळे सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सेलेब्रेटींच्या निधनामुळे सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. त्यात आता आणखी एका अभिनेत्यांच्या निधनामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अभिनेत्याला वेळीच मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. मल्याळम अभिनेता आणि डबिंग आर्टीस्ट प्रबीश चापाकल  केरळमधील कोची येथे एका जाहिरातीचे शूटिंग करत होते. त्याचवेळी त्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. ते ४४ वर्षांचे होते.

प्रबीश चापाकल हे यूट्यूब चॅनेलसाठी शूटींग करत होते. केरळमधील कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्यासाठी ही टीम जाहिरातीचे शूटिंग करत होती. त्यादरम्यान त्यांनी आपल्या सहकार्यांबरोबर एक ग्रुप फोटोही काढला होता. त्यावेळी त्यांना चक्कर आली. दरम्यान सहा कलाकारांनी आणि उपस्थितांनी त्यांना रूग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची मदत करण्यासाठी कोणीच तयार नव्हते.

एकही वाहन त्यांना मदत करण्यासाठी तयार नसल्यामुळे त्यांना रूग्णालयात घेऊन जाण्यात उशीर झाला. रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

प्रबीश यांनी अनेक टेलिफिल्म्समध्ये काम केले आहे. डबिंग कलाकार म्हणून अनेक चित्रपटात काम केले. त्यांनी अॅब्रिड शाईनवर आधारित कुंग फू मास्टर चित्रपटात खलनायिकाच्या व्यक्तिरेखेसाठी डबिंग केले होते. ते जेएसडब्ल्यू सिमेंट्स लिमिटेडचे कर्मचारीही होते. 

टॅग्स :गोळीबार