Join us  

Shocking : ‘ही’ अभिनेत्री खुलेआम करीत आहे सेक्सची आॅफर, पहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2017 11:19 AM

​‘इश्क-विश्क’ या चित्रपटातील अलीशा म्हणजेच अभिनेत्री शहनाज ट्रेजरीवाला तुम्हाला आठवते काय? होय, तुम्ही अगदी बरोबर विचार केला आहे. तिच शहनाज जिने इंडस्ट्रीत ‘अलीशा’ नावाने स्वत:ची ओळख निर्माण केली.

‘इश्क-विश्क’ या चित्रपटातील अलीशा म्हणजेच अभिनेत्री शहनाज ट्रेजरीवाला तुम्हाला आठवते काय? होय, तुम्ही अगदी बरोबर विचार केला आहे. तिच शहनाज जिने इंडस्ट्रीत ‘अलीशा’ नावाने स्वत:ची ओळख निर्माण केली; मात्र गेल्या काही दिवसांपासून ती इंडस्ट्रीतून गायब झाल्याने, ती पुन्हा बॉलिवूडपटात झळकणार काय? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना सतावत होता. आता आम्ही शहनाजविषयी एक बातमी घेऊन आलो असून, तिचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती प्रॅँक करताना बघावयास मिळत असून, खुलेआम लोकांना सेक्सची आॅफर करीत आहे.  अभिनय क्षेत्रात फारशी यशस्वी झाली नसलेली शहनाज तिच्या खासगी आयुष्यामुळेच अधिक चर्चेत राहिली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ती गर्भवती असल्याचे नाटक करीत आहे. नशेत बेधुंद असलेली गर्भवती शहनाज खुलेआमपणे लोकांना सेक्स करण्याविषयी विचारत आहे. ‘गर्भवती महिलेबरोबर तुला सेक्स करायला आवडेल काय?’ हे शहनाजचे प्रश्न अनेकांना बुचकळ्यात टाकणारे ठरत आहेत. प्रत्येकजण तिच्याकडे अशा काही नजरेने बघत आहेत की, ती कॅरेक्टरलेस महिला असावी. वास्तवात शहनाज हे नाटक करीत असून, हा व्हिडीओ म्हणजे प्रॅँक आहे. शहनाज चित्रपटांमधून जरी गायब असली तरी, सोशल मीडियावर ती नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. चाहत्यांसाठी ती नेहमीच तिचे फोटोज् शेअर करीत असते. जेव्हा शहनाजचा हा व्हिडीओ समोर आला होता, तेव्हा तिच्यावर सर्वत्र टीका करण्यात आली होती; मात्र शहनाजनेच पुढाकार घेत या व्हिडीओवर खुलासा केला होता. शहनाजने म्हटले होते की, ‘मी प्रॅँकच्या माध्यमातून लोकांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होते.’नुकतीच एक बातमी समोर आली होती की, शहनाज बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची तयारी करीत आहे. ‘ब्राउन नेशन’ नावाच्या शोमध्ये ती झळकण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त ‘द बिग सिक’ नावाच्या चित्रपटातही ती दिसण्याची शक्यता आहे. हा चित्रपट पाकिस्तानी आणि अमेरिकन परिवाराच्या कथेवर आधारित आहे. ज्यामध्ये शहनाज पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारताना बघावयास मिळेल, अशी चर्चा होती.