Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडमध्ये कामाच्या शोधात सारा अली खान, सिनेमाच्या ऑफर्स मिळवण्यासाठी या गोष्टींचाही घेतला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 10:44 IST

सारा अली खानने अल्पावधीतच इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले होते. मात्र आता तिला पुन्हा स्वतःला सिद्ध करावे लागणार हेच स्पष्ट होतंय.

स्टारडम सांभाळणं आणि ती बराच काळ समर्थपणे टिकवून ठेवणं हे प्रत्येकालाच जमत नाही. जितक्या वेगाने कलाकार लोकप्रियतेच्या यशशिखरावर पोहचतात तितक्याच झटकन ते खालीही फेकले गेले आहेत. स्वतःला मिळालेलं स्टारडम ते सांभाळू शकलेले नाही आणि वाट चुकले. परिणामी त्यांच्या वाट्याला अपयशच आले असे अनेक कालाकारांची उदाहरणं समोर आहेत.

अशी काहीशी परिस्थीती स्टारकिंडस म्हणून प्रचंड प्रसिद्धीत राहिलेली सारा अली खान बरोबर घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. ड्रग केसमुळे सारा खानचे नाव प्रचंड चर्चेत राहिले होते. त्यावेळी अनेकांनी तिच्यावर टीकाही केली होती. या प्रकरणानंतर साराकडे पाहण्याचा दृष्टीकोणही बदलत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

म्हणूनच साराच्या हातून काही दिवसांपूर्वी 'हिरोपंती २' हा सिनेमा गेला. त्यानंतर आता साराला 'अ‍ॅनिमल' या सिनेमातूनदेखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ड्रग्स केसमध्ये नाव आल्यानंतर साराला आता कामही मिळेणासा झाले आहे. जे स्ट्रगल सुरुवातीला साराला करावा लागला नाही, तो सघंर्ष आता तिच्या वाट्याला आला आहे. 

एरव्ही सैफ अली खानची मुलगी म्हणून साराला सिनेमे मिळालेही असतील पण आता तिच्याकडे कोणत्याही सिनेमाची ऑफर नाहीय. त्यामुळेच कामाच्या शोधात आता सारा कास्टिंग ऑफिसला भेट देत असल्याचे समोर आले आहे.  तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. यावरुनच साराने अल्पावधीतच इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले होते. मात्र आता तिला पुन्हा स्वतःला सिद्ध करावे लागणार हेच स्पष्ट होतंय.

... म्हणून मीडियाशी ठेवते यारी-दोस्ती, सारानं सांगितली अंदर की बात

सारा म्हणाली, आईने तिला सांगितले की सगळ्यात आधी मीडिया आणि प्रेक्षकांची काळजी घ्यायला हवी. अमृता म्हणाली, मी तुझी आई आहे, तू जे काही करतेस ते मला आवडेल. प्रेक्षकांना आणि माध्यमांना तू आवडणं सगळ्यात महत्त्वाचे आहे. सारा अली खान ज्या प्रकारे माध्यम आणि छायाचित्रकारांना भेटते, तिच्या वागण्याचे कौतुक नेहमीच केले जाते.

टॅग्स :सारा अली खान