Join us

Shocking : मलायका आणि अर्जुनच्या लग्नाविषयी पती अरबाज खाननेच दिली अशी प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 12:00 PM

वारंवार अरबाजला मलायकाबद्दल प्रश्न विचारले जात होते. त्यावेळी कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण त्याने दिले नव्हते अखेर अरबाजनेही मौन सोडलं आहे.

मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या अफेयरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. दोघांचं एकत्र दिसणं, फिरणं यांत काही नवं राहिलं नाही. लवकरच हे दोघं लग्न करणार असल्याची चर्चा आहे. मात्र या अफेयरबाबत अरबाज खानने मात्र मौनच बाळगले होते. वारंवार अरबाजला मलायकाबद्दल प्रश्न विचारले जात होते. त्यावेळी कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण त्याने दिले नव्हते अखेर अरबाजनेही मौन सोडलं आहे. पहिल्यांदाच त्याने अर्जुनसोबतच्या रिलेशनबाबत मजेशीर अशी रिअक्शन दिली आहे. अरबाजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ एका प्रमोशन अॅक्टीव्हीटी दरम्यानचा आहे. यावेळी अरबाजला अर्जुन मलायकाच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला गेला, त्यावेळी अरबाजनेही मोठ्या चलाकीने उत्तर देणे टाळले. विचारलेल्या प्रश्नवार उत्तर देण्याऐवजी त्याने हसण्यास सुरूवात केली आणि रिपोर्टरलाच उलट प्रश्न विचारत ती वेळ मारून नेली. अरबाजने मलायका आणि अर्जुनच्या नात्यावर बोलण्यास टाळले असले तरीही काही दिवसांपूर्वी खुद्द मलायकानेच त्यांच्या अफेयरबाबत पहिल्यांदा प्रतिक्रीया दिली होती.

''अरबाजसोबतचं नातं संपवायचं नव्हतं प्रत्येकाला जीवनात जोडीदार हवा असतो त्यावेळी अरबाजसह काडीमोड घेऊ नये” असं अनेकांनी सुचवलं होतं. मात्र काडीमोड घेण्याचा आपला निर्णय झाला होता आणि या निर्णयामुळे खूश आहे असंही तिने म्हटलं होते. जे काही झालं चांगलंच झालं हे सांगायलाही ती विसरली नाही. सारं विसरून जीवनात पुढे जाताना ज्याच्यासोबत तुमचं चांगलं नातं निर्माण व्हावं असा एक चांगला मित्र आणि जोडीदार असावा, तसं झाल्यास तुम्ही नशीबवान असता. जीवनात आनंदी राहण्याची दुसरी संधी मिळाली असं समजावं असं सांगत मलायकाने अर्जुनसोबतच्या चांगल्या संबंधांची अप्रत्यक्ष कबुलीच दिली. 

काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरलाही एका टॉक शोमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. गर्लफ्रेंड आणि कुटुंबीयांची भेट घडवून आणणार का असा प्रश्न त्याला विचारला होता. “असं व्हायलाच हवं, कारण गेल्या काही महिन्यात जे काही घडलंय त्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे” असं त्याने सांगितले होते. 

टॅग्स :अरबाज खानअर्जुन कपूरमलायका अरोरा