रोजच्या नेहमीच्याच जीवनात, आजूबाजूला घडणा-या आगळ्या-वेगळ्या गोष्टी आपलं लक्ष वेधून घेतात. महिलांच्या असुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. बलात्कार, अपहरण, विनयभंग आणि हत्यांच्या घटनांमध्ये वाढ होतेय. त्यामुळं अनेक सुन्न करणा-या घटना घडत असल्याचे पाहून भीतीचे वातावरणही पसरले आहे.
पश्चिम बंगालमधील बिजॉयगढ येथे एका २६ वर्षीय अभिनेत्रीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. पीडित अभिनेत्रीनेच याबाबतची माहिती देत सदर घटनेविषयी पोलिसांत तक्रार दाखल केली.
अभिनेत्रीनं पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन अभिनेत्रीची वैद्यकिय तपासणी केली आहे. उपलब्ध माहितीनुसार ५ जुलै रोजी अभिनेत्रीच्या घरी तिच्याच ओळखीचा एक व्यक्ती आर्थिक मदत मागण्यासाठी आला. पोलिसांना दिलेल्या माहितीत अभिनेत्रीने ती घरात एकटी होती असं सांगितलं. ज्यानंतर अभिनेत्रीला एकटं पाहून त्या व्यक्तीने त्याने विनयभंग केला. एवढंच नाही तर त्याने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं म्हटलं जात आहे.
इतक्यावरच न थांबता या घटनेची माहिती मिळाल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही त्या व्यक्तीनं दिल्याचं म्हटलं जात आहे. गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही हेच सा-या घटनांवरुन पुन्हा एकदा अधोरेखित झालयं. महिलांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालाय. महिलांवरील हल्ल्याचा आलेख सातत्यानं वाढत चाललाय.