Join us

SHOCKING ! बॉबी डार्लिंगने पतीविरूद्ध दाखल केली तक्रार! वाचा; बॉबीची धक्कादायक आपबीती!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2017 11:07 AM

‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक बॉबी डार्लिंग नव्याने चर्चेत आली आहे. होय, बॉबी डार्लिंगने पती रमणीक शर्मावर गंभीर आरोप करत, ...

‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक बॉबी डार्लिंग नव्याने चर्चेत आली आहे. होय, बॉबी डार्लिंगने पती रमणीक शर्मावर गंभीर आरोप करत, पतीविरोधात घरगुती हिंसाचार आणि अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली आहे. बॉबी डार्लिंगने फेब्रुवारी २०१६ मध्ये भोपाळमधील रमणीक शर्मा या व्यावसायिकाशी लग्न केले होते. बॉबीने लग्नानंतर आपले नाव बदलून पाखी शर्मा असे ठेवले होते.  पण आता या दोघांच्या संसाराला ग्रहण लागलेय. रमणीक मला दारु पिऊन मारझोड करायचा. परपुरुषासोबत माझे अनैतिक संबध असल्याचे खोटे आरोप करायचा. माझी प्रॉपर्टी आणि पैसे बळकावल्यानंतर त्याला माझ्या मुंबईतील घरावरही त्याला हक्क हवा होता, असे बॉबीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.लग्नाच्या काही दिवसांनंतरच रमणीकने माझ्याच पैशांनी  एसयुव्ही गाडी खरेदी केली. माझे सगळे पैसे उडवले. गेल्या काही दिवसांपासून त्याने माझ्यावर पाळत ठेवली होती.  इमारतीच्या वॉचमनला माझ्यावर नजर ठेवायला तो सांगायचा. मी कुठे जाते आणि कोणाशी बोलते यावरही रमणीक लक्ष ठेवून असायचा. त्यानंतर आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, माझ्या पैशाने घेतलेली गाडी आणि मालमत्ता परत दिली तरच मी घटस्फोट देईन, अशी अट मी घातली होती. मात्र, त्याने असे करण्यास नकार दिला. त्यानंतर रमणीकने मला अनेकदा मारहाण केली.  तो मला मारायचा आणि मी लहान मुलासारखी रडायची. अनेकदा त्याचा शारिरीक छळ मला असह्य व्हायचा. बरेचदा मी कपड्यात लघवी करायचे.   छळ असह्य झाल्याने अखेर मी त्याच्या तावडीतून निसटले आणि मोबाईल स्वीच आॅफ केला. भोपाळ एअरपोर्टच्या बाथरूममध्ये मी ८ तास लपून राहिले आणि कशीबशी दिल्लीला पोहोचले. मग दिल्लीत एफआयआर दाखल केला. माझी बरीचशी संपत्ती त्याच्या नावावर आहे. रमणीकने माझी सर्व मालमत्ता परत द्यावी, असेही तिने म्हटले आहे. ही मालमत्ता विकून मला मुंबईत परतायचे असल्याचेही तिने म्हटले.दरम्यान रमणीकने मात्र बॉबीचे हे सगळे आरोप फेटाळले आहेत. बॉबी खोटे बोलतेय. माझ्या किमती वस्तू घेऊन ती पळून गेलीय. मी तिच्याविरूद्ध तक्रार दाखल केलीय. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. तिला माझी संपत्ती बळकवायची आहे. म्हणून ती मला या प्रकरणात गोवतेय, असे त्याने म्हटलेय. तिच्यासोबत लग्न करण्यासाठी मी संपूर्ण कुटुंबाच्या विरोधात गेलो. ती  खोटं बोलली की, ती आई होऊ शकते. पण जेव्हा मला सत्य कळले तेव्हा मी तिला मुलं दत्तक घेण्याबद्दल किंवा आयवीएफच्या मदतीने मुलाला जन्माला द्यायचा पर्याय सुचवला. पण तिला मुलं सांभाळण्याची जबाबदारीच घ्यायची नाहीये, असे रमणीकने सांगितले.