Join us

धक्कादायक खुलासा...! या अभिनेत्रीकडे एका निर्मात्याने केली होती कॉम्प्रोमाइजची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 7:15 AM

सुरूवातीच्या काळात या अभिनेत्रीला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता,

मागील वर्षी बॉलिवूडमध्ये मीटू चळवळीनं जोर धरला होता. या मोहिमे अंतर्गत बऱ्याच दिग्गज व्यक्तींवर महिला लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आले होते. आता या चळीवळीचा परिणाम मल्याळम चित्रपटसृष्टीत पहायला मिळतोय. एका मुलाखतीत मल्याळम सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री गायत्री सुरेश हिने धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितलं की, तिला एका निर्मात्यानं कॉम्प्रोमाइज करायला सांगितलं होतं. 

एका एफएम रेडिओ वाहिनीशी बोलताना गायत्रीने सांगितले की,  तिला एकदा कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. करियरच्या सुरूवातीला तिला चित्रपटात काम देण्याच्या बदल्यात निर्मात्यानं चुकीच्या गोष्टीची मागणी केली होती.

गायत्री म्हणाली की, तो मला मॅसेज करून विचारायचा की तु तयार आहेस का? त्या माणसाला मी कधीच उत्तर दिलं नाही. मी त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं आणि त्यामुळे त्या प्रोजेक्टला घेऊन कोणतीच चर्चा झाली नाही.

गायत्रीच्या आधी मल्याळम अभिनेत्री पार्वतीने देखील खुलासा केला होता. तिने करियरच्या सुरूवातीच्या काळात तिला अशा काही डिमांड्सना सामारे जावे लागले होते. पण, तिने त्यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. कामाच्या बदल्यात कॉम्प्रोमाइज करायला सांगायचे म्हणून पार्वतीने ते प्रोजेक्ट नाकारले होते. 

मागील वर्षी मीटू चळीवळी अंतर्गत आलोकनाथ, साजिद खान, नाना पाटेकर व राजकुमार हिराणी यांच्यासोबत काही कलाकारांवर महिलांनी आरोप केले होते.