Join us

दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी समोर आली धक्कादायक माहिती, मृत्यूनंतरही तिचा फोन...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 6:16 PM

जेव्हा सुशांत प्रकरणाचा तपास करत असता दिशा सालियन प्रकरणाशी काही संबंध आहे का अशी पडताळणी करून पाहिली असता नवीन खुलासा समोर आला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. तसेच दिशा सालियन प्रकरणाचा या केसशी काही संबंध आहे का, हे देखील ते तपासून पाहत आहेत. दिशा सालियनने काही काळ सुशांतसोबत काम केले होते आणि सुशांतच्या निधनाच्या पाच दिवस आधी दिशा सालियनने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. आता दिशा सालियनचे कॉल डिटेल समोर आले आहेत ज्यातून समजलं की दिशाचा फोन तिच्या मृत्यूनंतरही अ‍ॅक्टिव्ह होता. पोलिसांनी सांगितले की, दिशाचा फोन डेटासाठी एक्टिव्ह केला होता.

टाइम्स नाऊच्या रिपोर्ट्सनुसार, दिशाचे कॉल डिटेल्स मिळाले आहेत. रिपोर्ट्सनुसार दिशाच्या मृत्यूनंतर देखील तिचा फोन वापरला जात होता. अद्याप हे समजू शकलेले नाही की तिचा फोन कोण वापरत होते. रिपोर्टमध्येहे देखील सांगितले गेले आहे की 8 जूनला दिशाच्या निधनानंतर 9, 10, 15 आणि 17 जूनलादेखील दिशाचा फोन वापरला गेला होता. आता मुंबई पोलिसांवर पुन्हा प्रश्नांचा भडीमारा होतो आहे की दिशाचा फोन कोण वापरत होते.

दिशाच्या मृत्यूनंतर तिचा फोन पोलिसांच्या कस्टडीत असायला हवा होता. जर फोन पोलिसांच्या ताब्यात होता तर त्या फोनचा वापर कोणी केला आणि जर पोलिसांनी फोन ताब्यात घेतला नाही तर तसं का केले? दिशाच्या फोनच्या माध्यमातून इंटरनेटचादेखील वापर केला जात होता.

दिशाच्या मृत्यूनंतप तिचा फोन वापरला गेल्याचा रिपोर्ट समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी सांगितले की, काही डेटा कलेक्शनसाठी त्यांनी दिशाचा फोन ऑन केला होता. पोलिसांनी हेदेखील सांगितले की, फोन ऑन केल्यानंतर कोणत्याही इनकमिंग कॉल किंवा मेसेजला उत्तर दिले नाही. पोलिसांनी सर्व कॉल्स आणि मेसेज रेकॉर्डमध्ये ठेवले आहेत. पोलिसांनी हेदेखील म्हटले की, फोन ऑन झाल्यानंतर इंटरनेट यूज स्वतःहून होऊ लागते.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतगुन्हा अन्वेषण विभाग