Shocking! कमल हासन व गौतमी अखेर विभक्त...१३ वर्षांचे नाते संपले!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2016 3:13 PM
होय, कमल हासन यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा वादळ आले आहे. गेल्या १३ वर्षांपासूनचे अभिनेत्री गौतमीसोबतचे कमल यांचे ‘लिव्ह इन’ ...
होय, कमल हासन यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा वादळ आले आहे. गेल्या १३ वर्षांपासूनचे अभिनेत्री गौतमीसोबतचे कमल यांचे ‘लिव्ह इन’ संबंध संपुष्टात आलेत. खुद्द गौतमीनेच तिच्या ब्लॉगवरून हे जाहिर केले. कमल-गौतमीच्या चाहत्यांना निश्चितपणे यामुळे धक्का बसला. हे सबंध संपुष्टात येण्यामागचे नेमके कारण गौतमीने स्पष्ट केलेले नाहीत. मात्र ‘आमचा मार्ग आता एक राहिलेला नाही. त्यामुळे दोघांनीही वेगवेगळ्या मार्गानेच गेलेले बरे...’, असे तिने लिहिलेय. हा निर्णय घेणे सोपे नव्हते, असेही तिने म्हटले आहे. गौतमीने आज १ नोव्हेंबरला ‘लाईफ अॅण्ड डिसीजन’ नामक ब्लॉक लिहिला आहे. यात तिने लिहिलेय, ‘मी आणि मि. हासन आता एकत्र नाहीत, हे जाहिर करताना आज मला प्रचंड दु:ख होते आहे. माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत घेतलेल्या निर्णयांपैकी हा सर्वांत कठीण निर्णय होता. एका घट्ट नात्याची विण सैल झालीय, हे पचवणे सोपे नाही. मार्ग वेगवेगळे आहेत, हे सत्य मानण्याशिवाय कधीकधी कुठलाही पर्याय उरत नाही. हे सत्य मान्य करून एकट्याने पुढे जाण्यातच शहाणपणा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जपलेल्या एका नात्याचा शेवट करणे माझ्यासाठी सोपे नव्हते. सहानुभूती मिळवणे वा कुणाला दोष देणे माझा उद्देश नाही. बदल हा जगाचा नियम आहे. माझ्या आयुष्यातून मीही हे शिकले आहे. मी सर्वांत आधी आई आहे आणि ही जबाबदारी निभवणे माझे पहिले कर्तव्य आहे. यालाच आता माझे प्राधान्य असेल. इंडस्ट्रीत येण्यापूर्वीपासून मी हासन यांची चाहती राहिली आहे, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. मी यापुढेही त्यांची चाहती असेल. त्यांच्या प्रत्येक कामात मी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले. ते क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची संधीही मला मिळाली. याबद्दलही मी स्वत:ला नशीबवान समजते. मि. हासन म्हणजे एक गुणांची खाण आहेत. भविष्यातही त्यांच्या चाहत्यांना त्यांच्यातील अनेक गुण पाहायला मिळतील, असा मला विश्वास आहे. त्यांच्या यशाची मी कामना करते.’