SHOCKING !! वारंवार का आजारी पडतोयं कपिल शर्मा? हे तर नाही खरे कारण??
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 8:10 AM
कॉमेडियन कपिल शर्मा याचे ग्रह सध्या फार चांगले नाहीत. आधी सुनील ग्रोवरसोबत त्याचे भांडण झाले आणि सुनील शो सोडून ...
कॉमेडियन कपिल शर्मा याचे ग्रह सध्या फार चांगले नाहीत. आधी सुनील ग्रोवरसोबत त्याचे भांडण झाले आणि सुनील शो सोडून गेला. तेव्हापासून कपिल सारखा आजारी(?) पडू लागलायं. जुलैपासून आत्तापर्यंत सात वेळा कपिलने आपल्या शोचे शूटींग रद्द केले आहे. सर्वांत आधी कपिलने परेश रावल यांच्या ‘गेस्ट इन लंडन’चे प्रमोशनल एपिसोडचे शूटींग रद्द केले होते. त्यानंतर शाहरूख व अनुष्का शर्मा ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोवर येणार होते. पण ऐनवेळी कपिलची तब्येत बिघडली अन् हे शूट रद्द केले गेले. त्यानंतरही अनिल कपूर व अर्जुन कपूरबदद्लही हेच घडले. इतकेच नाही तर अमिताभ बच्चन, परेश रावल, मनोज तिवारी, अर्जुन रामपाल यांच्यासोबतचे शोचे शूटही कपिलने ऐनवेळी तब्येतीचे कारण पुढे करून कॅन्सल केले. अगदी काल-परवा अजय देवगणसोबतचे शूटींगही कपिलने असेच रद्द केले. अजय व त्याची टीम ‘बादशाहो’च्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोवर येणार होती. पण पॅनिक अटॅकमुळे कपिलला ऐनवेळी शूटींग रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मग काय, अजय आल्या पावली परत गेला. ALSO READ : कपिल शर्मा आणि नवजोत सिंह सिद्धू यांच्यातही झाला वाद,वाचा सविस्तरआता प्रकृती साथ देत नसेल तर तिथे सगळ्यांचा नाईलाज आहे. पण कपिलबद्दल मात्र नाईलाज नक्कीच नाही. होय, सूत्रांचे मानाल तर कपिलच्या वारंवार शूट कॅन्सल करण्यामागे वेगळेच कारण आहे आणि हे कारण आहे, दारूचे व्यसन. होय, सूत्रांच्या मते, कपिलला दारूचे अतिव्यसन जडले आहे. लेट नाईट पार्टी आणि या पार्टीत अल्कोहोलचे अतिसेवन यामुळे कपिल सकाळी उशीरा उठतो आणि मग पुढचे सगळे शेड्यूलच बिघडते. विमानात कपिलचे सुनील ग्रोवरशी भांडण झाले, त्यावेळी कपिल अति दारू प्यायलेला होता, हे तुम्हाला ठाऊक आहेच. सूत्रांचे मानाल तर, या दारूमुळेच कपिलच्या करिअरची गाडी रूळावरून घसरू पाहतेय. डिप्रेशन, अति ताण, कमी रक्तदाब हे सगळे कपिलचे बहाणे आहेत. आता खरे काय, हे कपिललाच ठाऊक़ पण एक मात्र नक्की या सगळ्यांमुळे कपिलची इमेज खराब होतेय. ती होऊ द्यायची असेल तर कपिलने लवकर जागे होणे आवश्यक आहे.