पाकिस्तानचा प्रसिद्ध अभिनेता, गायक व मॉडेल मोहसिन अब्बास हैदरवर त्याच्या पत्नीनं मारहाणीचा आरोप केला आहे. फातिमा सोहेलने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपबीती सांगितली आहे. तिने घरगुती हिसेंबाबत लिहिलं आहे. फातिमाने सांगितलं की, तिच्या नवऱ्याने तिला प्रेग्नेंट असतानाही वाईटरित्या मारहाण केलं होतं.
फातिमा सोहेलने सोशल मीडियावर लिहिलं की, अन्याय सहन करणंदेखील गुन्हा आहे. त्यानंतर फातिमाने तिच्यावर घडलेल्या अन्यायाबद्दल सोशल मीडियावर सांगितलं. फातिमाच्या अनुसार, २६ नोव्हेंबर, २०१८ साली मी नवऱ्याला मला फसविताना रंगेहाथ पकडले होते. मात्र त्यावेळी त्याला लाज वाटण्याऐवजी त्याने मला मारहाण केली. त्यावेळी मी प्रेग्नेंट होते.
फातिमाने पुढे सांगितलं की, १९ मे रोजी मुलगा झाला. खुप सुंदर आहे. मात्र त्याला जन्म देण्यासाठी मला ऑपरेशन करावं लागलं. मी रुग्णालयात असताना तो गर्लफ्रेंडसोबत होता. दोन दिवसानंतर दिखावा करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आला. मुलासोबत फोटो काढला आणि पोस्ट केला. त्याला बाळाची काळजी नाही. माझ्या कुटुंबानं मला हे प्रकरण दाबून ठेवायला सांगितलं. पण आता मी असं करणार नाही. मला आवाज उठवावा लागेल.फातिमाने शेवटी मोहसिन आता मी तुला कोर्टात भेटेन असं सांगितलं. या सर्व प्रकरणावर मोहसिनने काहीही खुलासा केलेला नाही. त्याने पत्रकार परिषदेत या आरोपांचं उत्तर देईल आणि सर्व पुरावेही सादर करेन, असं सांगितलं.