Join us

Shocking : देहविक्री करणाऱ्या दोन अभिनेत्रींचा पोलिसांनी केला भंडाफोड!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 2:38 PM

हैदराबाद येथे देहविक्री करणाºया एका मोठ्या रॅकेटचा भंडाफोड करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी शनिवारी रात्री पंजागुट्टा आणि बंजारा ...

हैदराबाद येथे देहविक्री करणाºया एका मोठ्या रॅकेटचा भंडाफोड करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी शनिवारी रात्री पंजागुट्टा आणि बंजारा हिल्स या दोन हॉटेलांमध्ये छापा टाकत सेक्स रॅकेट चालविणाºया मोनीष के आणि व्यंकटेशला ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी सांगितले की, या छाप्यात ताब्यात घेण्यात आलेल्या काही महिलांना मुक्त करण्यात आले असून, त्यामध्ये एक बॉलिवूड अभिनेत्री आणि एका टीव्ही अभिनेत्रीचा समावेश आहे. या व्यतिरिक्त दोघा दलालांना पोलिसांनी अटक केली आहे. हे दलाल आॅनलाइनच्या माध्यमातून हे रॅकेट चालवित असते. ग्राहकांना हॉटेलमध्ये रूम बुक करण्यापासून ते मुली पुरविण्यापर्यंतचे काम या दलालांकडून केले जात होते. दरम्यान, पोलिसांनी या दोन्ही अभिनेत्रींच्या नावांचा खुलासा करणे टाळले आहे. टास्क फोर्स निरीक्षक नागेश्वर राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोडण्यात आलेल्या महिलांपैकी दोन महिला अभिनय क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यातील एक मुंबईमधील रहिवासी असून, दुसरी कोलकाता येथील आहे. पंजागुट्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. रविंदर यांनी सांगितले की, ताज डेक्कन हॉटेलमध्ये देहविक्री केली जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या हॉटेलमधील काही रूममध्ये छापा टाकला. त्यामध्ये काही महिला तथा तरुणी देहविक्री करीत असल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही दलालांवर यापूर्वीही देहविक्रीसंदर्भात गुन्हे दाखल असून, त्यांच्यावर पीआयटीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आणखी काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. कारण अभिनेत्रींचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याने त्यांचे ग्राहक इंडस्ट्रीशी संबंधित आहेत काय? यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.