Join us

धक्कादायक!, या माध्यमातून परदेशात पाठवले जात होते पॉर्न सिनेमे, राज कुंद्राचे असे सुरू होते गैरव्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 1:37 PM

पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा याला अटक करण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म बनवल्याचा आणि अॅपवर अपलोड केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याला मुंबई क्राईम ब्रँचच्या टीमने ही कारवाई केली आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या नुसार, राज कुंद्राने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये ८ ते १० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. क्राईम ब्रँचने सोमवारी राज कुंद्राला चौकशीसाठी बोलवले होते आणि त्यानंतर त्याला अटक केली. क्राईम ब्रँचचे म्हणणे आहे की, फेब्रुवारी, २०२१मध्ये क्राईम ब्रँचने मुंबईत अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी आणि ते अॅपवर अपलोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

अश्लील चित्रपटांच्या शूटिंगप्रकरणी क्राईम ब्रँचने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल केला होता आणि या प्रकरणाचा तपास सुरू होता. जेएल स्ट्रिम नामक अॅपचे मालिका राज कुंद्रा इंडियन प्रीमियर लीगची टीम राजस्थान रॉयल्सचे सहमालक आहेत.

मुंबई क्राईम ब्रँचने म्हटले की, राज कुंद्रा या पूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड आहे. राज कुंद्रा आणि त्याचा ब्रिटेनमध्ये राहणाऱ्या भावाने केनरिन नामक कंपनी सुरू केली आहे. ज्यावर पॉर्न फिल्म दाखवले जातात. या चित्रपटांचे व्हिडीओ भारतात शूट केले जात होते आणि वी ट्रान्सफरच्या माध्यमातून परदेशात पाठवले जात होते. या कंपनीचे रजिस्ट्रेशन राज कुंद्राने परदेशात केले होते कारण सायबर लॉपासून बचाव करता येईल. हे सिनेमे पेड मोबाईल एप्लिकेशनवर रिलीज केले जात होते. 

हॉटेल्स आणि घर भाड्याने घेऊन पॉर्न फिल्म शूट केले जात होते. मॉडेल्सला काम देण्याच्या बहाण्याने अश्लील चित्रपटात काम करायला लावले जात होते. त्यानंतर लोकांकडून पॉर्न सिनेमे पाहण्यासाठी पैसे घेतले जात होते. तपासात हेदेखील समोर आले आहे की, मुलींना मोठ्या चित्रपटात काम देतो असे लालूच दाखवून जबरदस्तीने त्यांच्याकडून अश्लील सिनेमात काम करून घेतले जात होते.

पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे राज कुंद्रा याच्या विरोधात फक्त आरोपींचे स्टेटमेंट नसून टेक्निकल पुरावेदेखील आहेत. राज कुंद्राने या इंडस्ट्रीत ८ ते १० कोटींची गुंतवणूक केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी दोन एफआयआरच्या फाइल बनवल्या आहेत आणि या प्रकरणी एकूण ९ जणांना अटक केली आहे.

टॅग्स :राज कुंद्राशिल्पा शेट्टी