बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताला सिनेइंडस्ट्रीत दोन वेळा कास्टिंग काउचला बळी पडावे लागले होते. याबद्दल तिने एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला. ईशा गुप्ता म्हणाली की, जे लोक इंडस्ट्रीबाहेरचे असतात, त्यांना जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. सिनेइंडस्ट्रीशी निगडीत कुटुंबातील मुलांना कधीच कास्टिंग काउचचा सामना करावा लागत नाही. ईशा गुप्ताने म्हटले की, एकदा मी चित्रपट निर्मात्यांसोबत झोपण्यासाठी नकार दिला तेव्हा मला तो चित्रपटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता.
अभिनेत्री ईशा गुप्ताने करिअरची सुरूवात इमरान हाश्मीसोबत जन्नत २ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती रुस्तम, पलटन आणि बादशाहों यासारख्या चित्रपटात झळकली. आता तिने एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीत होणाऱ्या कास्टिंग काउचबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
ईशा गुप्ता म्हणाली की, मी अशा एका माणसाचे घाणेरडे रुप पाहिले होते. त्याच्यासोबत झोपण्यासाठी नकार दिल्यानंतर त्या व्यक्तीला मला चित्रपटातून बाहेर काढायचे होते. चित्रपटाचे शूटिंग सुरू होते आणि यादरम्यान मध्येच निर्माता आला त्याने म्हटले की, त्यांना माझ्यासोबत काम करायचे नाही.ईशा गुप्ता पुढे म्हणाली की, निर्माता दिग्दर्शकाला म्हणाला की, मी चित्रपटात नको आहे तरीदेखील मी तिथे का आहे? त्यावेळी शूटिंग चालू होती आणि दिग्दर्शक म्हणाला की, ती माझी हिरोईन आहे. दिग्दर्शक माझ्याकडे आला आणि मला विचारले की, या मुलासोबत असे झाले आहे का?, मी त्यांच्याकडे पाहिले, हसले आणि म्हटले की हो सर. का?, ते म्हणाले नाही. त्याने मला आता म्हटले की, ईशा चित्रपटात का आहे?. त्यावर ईशा गुप्ता म्हणाली की, मला जाणीव झाली की असे लोकदेखील आहेत, जे मला काम देत नाही. कारण ते म्हणतात की, ती काही करत नाही. काय गोष्ट आहे?