सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करताना आता सीबीआयसमोर नवीन खुलासे समोर येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार आता या प्रकरणात ड्रग्सचा अँगलही समोर आला आहे. रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून हैराण करणारी बाब समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार हे रिट्रीव चॅट्स आहेत जे रियाने बोलल्यानंतर डिलिट केले होते. या चॅट्समध्ये रियाने गौरव आर्या, सॅम्युअल मिरांडा आणि जया साहासोबत बातचीत करत आहे. दरम्यान रियाच्या वकिलाने या सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. टाइम्स नाऊच्या रिपोर्ट्सनुसार तिच्या वकिलांचे असे म्हणणे आहे की रियाने कधी ड्रग्ज घेतले नाही आहेत.सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने पहिले चॅट तिच्या आणि गौरव आर्यामधील आहे. गौरव तोच इसम आहे, जो ड्रग डीलर असल्याचे म्हटले जात आहे. या चॅटमध्ये असे लिहिले आहे की, 'जर आपण हार्ड ड्रग्जबाबत बोललो तर मी जास्त ड्रग्जचा वापर केला नाही आहे'. हा मेसेज रियाने 8 मार्च 2017 रोजी गौरवला पाठवला होता.
दुसऱ्या चॅटमध्ये रियाने गौरवशी बातचीत केली आहे. यामध्ये रियाने गौरवला विचारले आहे की, ' तुझ्याकडे MD आहे का?'. एमडीचा अर्थ MDMA असा होतो जे खूप स्ट्राँग ड्रग आहे.
तिसरे चॅट हे चॅट रिया आणि जया साहा यांच्यामधील आहे. हे चॅट 25 नोव्हेंबर 2019 चे आहे. ज्यामध्ये जयाने रियाला असे म्हटले आहे की मी त्याला श्रुतीशी को-ऑर्डिनेट करायला सांगितले आहे. त्यावर रियाने धन्यवादचा मेसेज केला आहे. त्यानंतर जयाने नो प्रॉब्लेब, आशा आहे की याची मदत होईल, असा रिप्लाय दिला आहे.
चौथ्या चॅटमध्ये जया रियाला म्हणाली की, 'चहा, कॉफी किंवा पाण्यामध्ये 4 थेंब टाक आणि त्याला ते पिऊ दे. परिणाम पाहण्यासाठी 30 ते 40 मिनीट थांब'. दोघांमध्ये हे संभाषण 25 नोव्हेंबर 2019 रोजी झाले होते.एप्रिल 2020 मधील पाचवे चॅट हे मिरांडा आणि रियामधील आहे. त्यामध्ये मिरांडाने म्हटले की - 'हाय रिया, स्टफ जवळपास संपला आहे.'
सहाव्या चॅट एप्रिलमध्ये झाले असून त्यात पुन्हा एकदा मिरांडाने रियाला असे विचारले की, 'काय आपण हे शौविकच्या मित्राकडून घेऊ शकतो? पण त्याच्याकडे फक्त Hash आणि bud आहे'. यांना लोअर लेव्हलचे ड्रग मानले जाते.दरम्यान ईडीला रियाच्या फोनमध्ये एका संशयास्पद ड्रग डीलरचा नंबर मिळाला होता. रियाचा फोन ईडीने रिट्राइव्ह केला, तेव्हा त्यांना एका ड्रग डीलरशी केलेले चॅट मिळाल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. एवढेच नव्हे तर रियाने या अंमली पदार्थ तस्कराशी चॅट करून ते डिलिट केल्याचा दावा देखील केला जातो आहे.