अभिनेत्री रवीना टंडन(Raveena Tandon)ने नुकत्याच एका मुलाखतीत सिनेइंडस्ट्रीतील राजकारण आणि गटबाजीमुळे गमावलेल्या चित्रपटांबद्दल सांगितले आहे. रवीनाने बॉलिवूडमधील तीव्र स्पर्धा आणि अनेक चित्रपटांमध्ये तिची जागा कशी घेतली गेली याबद्दलही सांगितले. रवीना टंडनने नव्वदच्या दशकात तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिचा पहिला चित्रपट 'पत्थर के फूल' हा सुपरहिट ठरला होता.
रवीना टंडनने 'लहरें रेट्रो'ला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडमधील राजकारण आणि स्पर्धेवर खुलेपणाने बोलली आणि अनेक धक्कादायक खुलासे केले. 'साजन चले ससुराल'मधूनही तिला रिप्लेस करण्यात आल्याचे अभिनेत्रीने सांगितले. करिश्मा कपूरच्या आधी ती हा चित्रपट करणार होती. रवीना टंडन म्हणाली, 'मी नेहमीच निरोगी स्पर्धेवर विश्वास ठेवते कारण ती तुमच्यातील सर्वोत्तम गोष्टी बाहेर आणते. पण मी धर्मांध व्यक्ती नाही.
''मी तसे राजकारण आणि गटबाजी कधीच केली नाही, पण...''
ती पुढे म्हणाली की, रवीनाने मला कोणत्याही प्रोजेक्टमधून बाहेर काढले किंवा रवीनाने कोणत्याही नवोदित व्यक्तीसोबत काम करण्यास नकार दिला असे कोणीही म्हणू शकत नाही. मी तसे राजकारण आणि गटबाजी कधीच केली नाही, पण इतरांनी उघडपणे माझ्याविरुद्ध राजकारण केले आहे. रवीना पुढे म्हणाली, 'मला डेव्हिड धवन आणि गोविंदासोबत 'साजन चले ससुराल' करायचा होता आणि त्यांनी मला हे नंतर सांगितले. मी 'विजयपथ' देखील साइन केला होता. पण हादेखील चित्रपट हातून गेला. तब्बू या बाबतीत नेहमीच आश्चर्यकारक राहिली आहे. ती कधीच राजकारणात नव्हती. इतरांबद्दल असे म्हणू शकत नाही.