Join us

माझ्यावर विषप्रयोग कुणी केलाय त्याबद्दल मला माहिती होते, पण.....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 11:10 AM

लताजी यांना रेकॉर्डींगवेळी कोणत्याही प्रकारचा ताण येत असेल तर लगेचच मला घरी परत आणतील. सुदैवाने चांगले रेकॉर्डिंग झाले, माझा आवाज मी गमावला नव्हता याचाच मला आनंद होता. शेवटी याच गाण्याला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पहिल्यांदाच एक गौप्यस्फोट केला आहे. बॉलिवूड हंगामा या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत  त्यांच्याशी निगडीत एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. त्यांच्या करिअरमध्ये त्या यशशिखरावर असताना त्यांना अचानक विषबाधा झाली होती. त्यावेळी जवळपास तीन महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते.मात्र आजारपणाचा जास्त बाऊ न करता त्यांनी त्यावरही मात करत पुन्हा जोमाने काम करू लागल्या.

त्यांना विषबाधा कशी झाली याविषयी  चांगलेच माहिती होते.  'माझ्यावर झालेला विषप्रयोग नेमका कुणी केलाय ते आम्हाला कळलं होते. पण त्याच्याविरोधात आम्ही काही अॅक्शन  घेतली नाही. कारण आमच्याकडे काही त्याविषयी ठोस पुरावे नव्हते. पण त्यावेळी माणसाच्या अशा वागण्याचंही आश्चर्यच वाटतं. आजही ती घटना आम्ही कोणीही विसरू शकलो नाही. ब-याच जणांना याविषयी फारसे काही माहितीही नाही.

 

मजरूह सुल्तानपुरी यांची लता मंगेकर यांना मोठा आधार दिला.  "मजरुह साहब रोज संध्याकाळी घरी येऊन माझ्या शेजारी बसून आणि कविता पठण करून माझे मनोरंजन करायचे. बरे झाल्यानंतर लताजींचे पहिले गीत 'कहीं दीप जले कहीं दिल' हेमंत कुमार यांनी संगीतबद्ध केले होते. लताजी म्हणतात, "हेमंत दा घरी आले आणि आईची परवानगी घेऊन मला रेकॉर्डिंगसाठी नेले. त्यांनी माझ्या आईला वचन दिले की, लताजी यांना रेकॉर्डींगवेळी कोणत्याही प्रकारचा ताण येत असेल तर लगेचच मला घरी परत आणतील. सुदैवाने चांगले रेकॉर्डिंग झाले,  माझा आवाज मी गमावला नव्हता याचाच मला आनंद होता. शेवटी याच गाण्याला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

टॅग्स :लता मंगेशकर