Join us

Shocking : ७५ वर्षीय जितेंद्र यांच्यावर बहिणीनेच केला लैंगिक शोषणाचा आरोप !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2018 4:44 PM

हिमाचल प्रदेशातील शिमला पोलीस ठाण्यात प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांच्यावर लैंगिक शेषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने आरोप ...

हिमाचल प्रदेशातील शिमला पोलीस ठाण्यात प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांच्यावर लैंगिक शेषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने आरोप केला की, १९७१ मध्ये एका हॉटेलमधील रूममध्ये अभिनेते जितेंद्र यांनी त्यांचे लैंगिक शोषण केले होते. पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार, ही घटना ४७ वर्षांपूर्वीची असून, त्यावेळी पीडिताचे वय १८ वर्ष होते. तर जितेंद्र यांचे वय २८ वर्ष होते. जितेंद्र आपले चुलत भाऊ असल्याचा दावा करणाºया या महिलेने आपबिती सांगताना म्हटले की, जितेंद्र त्यावेळी माझ्या दिल्ली येथील घरी आले होते. तेथून ते मला शिमला येथे शूटिंगच्या सेटवर घेऊन गेले. जितेंद्र यांच्याशी असलेले नाते लक्षात घेता संबंधित महिलेच्या परिवाराने त्यांना जितेंद्र यांच्यासोबत जाण्यास परवानगी दिली. पुढे ते मला हॉटेलमध्ये घेऊन गेले. याठिकाणी त्यांनी नशेत माझ्यावर बलात्कार केला. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, एवढा काळ मी शांत होती. परंतु आई-वडिलांच्या निधनानंतर मी याविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेतला. कारण माझ्या आई-वडिलांना जर ही घटना समजली असती, तर त्यांना प्रचंड धक्का बसला असता. त्यामुळे मी एवढ्या वर्षांपासून मानसिक यातना सहन करीत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून जगभरात #MeeToo हे अभियान राबविले जात असल्यानेच मी हिंमत करून याविषयी आवाज उठविला आहे. दरम्यान, जितेंद्र यांचे वकील रिजवान सिद्दिकी यांनी हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, जवळपास ५० वर्ष जुन्या आणि निरर्थक आरोपांना कुठलाही कायदा एंटरटेन करीत नाही. कायद्यानुसार कुठलीही तक्रार तीन वर्षांच्या आत करायची असते. जेणेकरून आरोपानुसार तपास करता येईल. जितेंद्र यांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेता म्हणून जितेंद्र यांना ओळखले जाते. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी एयर होस्टेस शोभा कपूर यांच्यासोबत पळून जाऊन लग्न केले. निर्माता एकता कपूर आणि अभिनेता तुषार कपूर जितेंद्र आणि शोभा या दाम्पत्याची मुले आहेत. लग्नाअगोदर जितेंद्र यांचे नाव श्रीदेवी आणि हेमा मालिनी यांच्यासोबत जोडले जात होते.