Join us

Shocking : सुपरस्टार रजनीकांतला एका महिलेने भिकारी समजून दिले होते दहा रुपये!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2017 11:22 AM

सुपरस्टार रजनीकांत सध्या त्यांच्या आगामी ‘२.०’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, यादरम्यान त्यांच्या आयुष्याशी निगडित अनेक मजेशीर किश्श्यांचा उलगडा ...

सुपरस्टार रजनीकांत सध्या त्यांच्या आगामी ‘२.०’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, यादरम्यान त्यांच्या आयुष्याशी निगडित अनेक मजेशीर किश्श्यांचा उलगडा होत आहे. असाच काहीसा एक मजेशीर किस्सा समोर आला असून, ते वाचून त्यांचे चाहते नक्कीच अचंबित होत आहेत. त्याचे झाले असे की, २००७ मध्ये आलेल्या ‘शिवाजी : द बॉस’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली होती. त्यामुळे रजनीकांत यांनी देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाण्याचे ठरविले. परंतु तेथील सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन सुरक्षारक्षकांनी त्यांना एका म्हाताºया व्यक्तीच्या गेटअपमध्ये जाण्याचा सल्ला दिला. मग पुढे जे काही घडले ते विश्वास ठेवण्यापलीकडचे होते. रजनीकांत यांनी सांगितले की, मी सुरक्षारक्षकांच्या सूचनेनुसार म्हाताºया व्यक्तीच्या गेटअपमध्ये मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. जेव्हा मी मंदिराच्या पायºया चढत होतो, तेव्हा एक महिलादेखील माझ्यासोबत येत होती. त्या महिलेच्या मनात माझ्याप्रती दया आली. तिने मला भिकारी समजून माझ्या हातावर दहा रुपयांची नोट टेकविली. पण मी काही रिअ‍ॅक्ट न होता मंदिरात गेलो. देवाचे दर्शन घेतले अन् पर्समधील सर्व पैसे दानपेटीत टाकले. मी जेव्हा पैसे दानपेटीत टाकत होतो, तेव्हा ती महिला मला बघत होती. तिला संशय आला. तिने माझे बारकाईने निरीक्षण केले अन् मला ओळखले. नंतर ती माझी माफी मागत होती. जेव्हा रजनीकांत यांनी हा सर्व किस्सा सांगितला तेव्हा ऐकणाºयांमध्ये एकच हशा पिकला. सुपरस्टार रजनीकांतसोबत असाही प्रसंग घडू शकतो, यावर कोणाचाच विश्वास बसला नसेल, हेही तेवढेच खरे. असो, रजनीकांत यांना पहिला ब्रेक १९७५ मध्ये वयाच्या २५व्या वर्षी मिळाला होता. ‘अपूर्व रागणगल’ या तामीळ चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात कमल हसन याची मुख्य भूमिका होती. दिग्दर्शक बालचंदर यांच्या या चित्रपटात रजनीकांत यांनी केवळ १५ मिनिटांची भूमिका केली होती. कदाचित प्रेक्षकांनी त्यांची ही भूमिका नोटीसही केली नसावी. कारण त्यावेळी कोणी विचार केला नसेल की, साधा दिसणारा हा व्यक्ती पुढे जाऊन सुपरस्टार बनेल. वास्तविक दिग्दर्शक के. बालचंदर आणि रजनीकांत यांची भेट एका फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये झाली होती. पुढे दुसºया दिवशी बालचंदर यांनी रजनीकांत यांना त्यांच्या आॅफिसमध्ये बोलाविले. जेव्हा रजनीकांत यांनी बालचंदर यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी रजनीकांतला त्यांच्या पुढच्या चित्रपटाची आॅफर दिली. त्यावेळी रजनीकांत यांना विश्वासच बसला नाही की, एवढ्या मोठ्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने आपल्याला चित्रपटाची आॅफर दिली. त्यावेळी बालचंदर यांनी त्यांच्या एका मित्राला सांगितले होते की, ‘या मुलाच्या डोळ्यात आग आहे. हा मुलगा एक दिवस तामिळनाडूमध्ये वादळ निर्माण करेल.’ पुढे रजनीकांत निर्मात्यांचे फेव्हरेट ठरू लागले. आता रजनीकांत सुपरस्टार झाले आहेत.