गेल्या काही दिवसांपासून सोनम कपूरला वाईट अनुभव येत आहेत. सोनम कपूर सध्या ट्रॅव्हेल करत आहे आणि तिला या प्रवासात एकानंतर एक असे वाईट अनुभव येत आहेत. काही दिवसांपूर्वी बाहेरगावी प्रवास करताना सोनमचं सामान हरवलं होतं आणि आता लंडनमध्ये तिला आलेल्या वाईट अनुभवानंतर ती हादरून गेली आहे.
सोनम कपूरने लंडनमध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल ट्विटरवर सांगितलं आहे. तिने ट्विट केलं की, लंडनमध्ये कॅब सर्विस उबरसोबत तिला भयावह अनुभव आला. तिने म्हटलं की, मला लंडनमध्ये उबरसोबत भयावह अनुभव आला आहे. कृपया तुम्ही लक्ष ठेवा. तिथे तुम्ही लोकल कॅब व लोकल वाहनांचा वापर केलात तर योग्य राहिल आणि सुरक्षित रहा. मी पूर्णपणे हादरली आहे.
सोनमच्या या ट्विटनंतर चाहते, मित्र व कुटुंबातील व्यक्तींनी कमेंटवर या प्रकरणाबद्दल विचारले. एका युजरने काय झाल्याचे विचारले. दुसऱ्या युजरने विचारले की, काय झालं सोनम? लंडनमध्ये कॅबचा वापर करणारा व्यक्ती असल्यामुळे मला याबद्दल जाणून घेतलं तर मदत होईल.
यावर सोनमने उत्तर दिलं की, त्यांचा कॅब ड्रायव्हर मानसिकरित्या त्रस्त होता आणि तो तिच्यावर सारखा ओरडत होता. सोनमने लिहिले की, माझा ड्रायव्हर अस्थिर होता आणि जोराजोरात ओरडत होता. शेवटपर्यंत मी खूप घाबरली होती.
सोनमच्या ट्विटवर उबरने उत्तर दिलं. उबरच्या ग्लोबल हेल्पलाईन अकाउंटने उत्तर देत सांगितलं की, त्यांचे कस्टमर कोणतीही तक्रार करू शकतात. सोनमने अद्याप त्यांना यावर उत्तर दिलेलं नाही.
काही दिवसांपूर्वी सोनमने ब्रिटीश एअरवेजबद्दल ट्विट केलं होतं. सोनमने सांगितलं होतं की, तिसऱ्यांदा ती या एअरवेजने ट्रॅव्हेल करते आहे आणि तिची दुसऱ्यांदा बॅग हरवली आहे. यातून तिला शिकवण मिळाली आहे की यापुढे पुन्हा या ब्रिटीश एअरवेजने ट्रॅव्हेल करणार नाही. यावर ब्रिटीश एअरवेजने तिची माफी मागितली होती आणि तिची बॅग लवकरात लवकर परत करण्याचे वचन दिले होते.