Join us

फक्त या अटीवर मिळणार ‘शोले’च्या रिमेकची परवानगी, वाचा काय आहे ही अट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 1:07 PM

आजच्या रिमेक आणि रिमिक्सच्या काळात ‘शोले’च्या रिमेकची चर्चा अधूनमधून होते.

ठळक मुद्दे‘शोले’प्रदर्शित झाला, तेव्हा त्या काळातला एक महागडा चित्रपट होता.

भारतीय सिनेमातील अजरामर कलाकृतींपैकी एक असलेला ‘शोले’ चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ या दिवशी प्रदर्शित झाला होता. सुरुवातीला चित्रपटाला प्रेक्षकांची जेमतेम पसंती मिळाली. पण अचानक या चित्रपटाने रसिकांच्या मनाची इतकी घट्ट पकड घेतली, गेल्या इतक्या वषार्पासून या चित्रपटाची जादू आहे तशीच आहे. अशात भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास नोंदवणा-या या चित्रपटाच्या रिमेकची चर्चा होणार नाही तर नवल. आजच्या रिमेक आणि रिमिक्सच्या काळात ‘शोले’च्या रिमेकची चर्चा अधूनमधून होते. मात्र खुद्द ‘शोले’चे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचे यावर काय मत आहे? एका ताज्या मुलाखतीत रमेश सिप्पी यावर बोलले.

आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत रमेश सिप्पी यांनी ‘शोले’च्या रिमेकबद्दलची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, एखाद्याने ‘शोले’ अगदी वेगळ्या आणि अनोख्या अंदाजात साकारण्याबद्दल विचार केला तर ठीक. अन्यथा या चित्रपटाच्या रिमेकबद्दल मी तसा फार उत्साहित नाही. याचा अर्थ मी रिमेकच्या विरोधात आहे, असेही नाही. कारण अनेक चित्रपटांचे सुंदर रिमेक बनवले गेले आहेत. कुठलाही चित्रपट, त्याचे जग तुम्ही कसे साकारता, हे अधिक महत्त्वाचे आहे.

तुम्हाला ठाऊक असेलच की, 2007 साली राम गोपाल वर्मा यांनी ‘राम गोपाल वर्मा की आग’ नावाने ‘शोले’चा रिमेक बनवला होता. जो सर्वांत मोठा फ्लॉप ठरला होता. या चित्रपटाला प्रचंड टीका सहन करावी लागली होती. विशेष म्हणजे, राम गोपाल वर्माच्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, अजय देवगण असे दिग्गज कलाकार होते.

‘शोले’प्रदर्शित झाला, तेव्हा त्या काळातला एक महागडा चित्रपट होता. हिंदी चित्रपटही तीस ते चाळीस लाखांत तयार होत, त्या काळात ‘शोले’साठी निर्मात्यांनी ३ कोटी रुपये खर्च केले होते. यात धर्मेन्द्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, जया भादुडी, संजीव कुमार असे अनेक कलाकार होते. चित्रपटातील डायलॉगही अफाट गाजले होते.

टॅग्स :अमिताभ बच्चनधमेंद्रबॉलिवूड