बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी चित्रपट 'दबंग ३'च्या चित्रीकरण वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. मध्य प्रदेशमधील शिवलिंग विवादानंतर आता समजते आहे की 'दबंग ३'चा शूटिंग सेट मध्यप्रदेशमधील मांडू येथील जल महल वरून हटवावे लागले. सूत्रांच्या माहितीनुसार जल महलमध्ये 'दबंग ३'चे शूटिंग सुरू होते. मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने नोटिस पाठवल्यानंतर दबंगचा सेट काढावा लागला. नुकतेच मुंज तलावात चित्रीकरण करण्यात आले.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने सलमान खान आणि त्याच्या टीमला आदेश दिला की मध्य प्रदेशमधील मांडू येथील ऐतिहासिक जल महलमध्ये बनवण्यात आलेले सेट काढून टाकावेत. नोटिसनुसार 'दबंग'च्या क्रुने जल महलमध्ये सेट बनवून प्राचीन स्मारक व पुरातत्व स्थळ आणि अवशेष अधिनियम १९५९च्या नियमाचे उल्लंघन केले आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'दबंग ३'च्या टीमवर आरोप आहे की, त्यांनी नर्मदा नदीजवळ असलेल्या किल्ल्याला नुकसान पोहचवले आहे.
तसेच सलमान संजय लीला भन्साळीच्या 'इंशाअल्लाह'मध्ये देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात त्याच्यासोबत आलिया भट झळकणार आहे.