देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना ज्या कारागृहात कैद केले होते, त्याठिकाणी आफताब शिवदासानी आणि श्रेयस तळपदे यांनी ‘सेटर्स’ या चित्रपटाचे काही सीन्स चित्रीत केले आहेत. आश्विनी चौधरी दिग्दर्शित ‘सेटर्स’ चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण नवी दिल्लीतील दर्या गंज चौकी, जयपूरचे हवामहल, वाराणसीतील अस्सी घाट, मणिकर्णिका घाट, रामपूर फोर्ट या ऐतिहासिक ठिकाणी चित्रपटातील काही सीन्स शूट करण्यात आले आहेत. ‘सेटर्स’ या सामजिक-राजकीय थ्रिलरपटात अभिनेता आफताब शिवदासानी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. श्रेयस तळपदे याने खलनायकाच्या भूमिकेत दिसत असून तो शिक्षणाच्या क्षेत्रातील माफियाच्या भूमिकेत दिसणार आहे. वाराणसी, जयपूर, मुंबई, नवी दिल्ली या राज्यातील माफियाचे जाळे आणि होत असलेल्या वेगवेगळया घडामोडी, डमी उमेदवार, पेपर फिक्सिंग असे गैरप्रकार यांच्याबद्दल हा चित्रपट आधारित आहे. दिग्दर्शक आश्विनी चौधरी सांगतात,‘ स्वातंत्र्यपूर्व काळात भारताने स्वप्न पाहिले होते, भावी युवापिढी ही शिक्षणाच्या बाबतीत परिपूर्ण असणार आहे. शिक्षणप्रक्रिया ही अत्यंत पारदर्शी आणि निकोप असेल. मात्र, सध्याची शिक्षणपद्धती पाहिली असता शिक्षणाचे वाढते बाजारीकरण, फेक यंत्रणा असे प्रकार वाढले आहेत. आपण आधुनिक भारत म्हणवतो पण, सध्याचे चित्र काहीसे वेगळे दिसत आहे. भावी युवापिढीचे भविष्य अंधारात असल्याची चिन्हे आहेत. शासन या अशा गैरप्रकारांवर कुठलीही कारवाई करत नाही, त्यामुळे अशा गैरप्रकारांना आळा बसत नाही.’
महात्मा गांधीजींच्या कारागृहात ‘सेटर्स’ चित्रपटाच्या काही सीन्सचे शूटिंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 11:44 AM