Join us

सनी लिओनीने सुरू केले आगामी चित्रपटाचे शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2018 11:11 AM

बॉलिवूडमध्ये मिळालेल्या यशावरून प्रेरित होऊन सनी लिओनी आता साऊथ इंडिअन चित्रपटात पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी सनीने तेलगू चित्रपट ...

बॉलिवूडमध्ये मिळालेल्या यशावरून प्रेरित होऊन सनी लिओनी आता साऊथ इंडिअन चित्रपटात पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी सनीने तेलगू चित्रपट साइन केला असल्याची घोषणा तिने सोशल मीडियावर केली होती. आता ह्या चित्रपटाचे चित्रीकरण ७ फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी सुरू झाले आहे.या चित्रपटाच्या शूटिंगची माहिती राज शेखरने ट्विटर वर दिली आहे त्याने आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, 'सनी लिओनीने तिच्या विरमादेवी चित्रपटचे शूटिंग चेन्नईमध्ये सुरू केले आहे. सनीने या आधी ह्या चित्रपटाच्या संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते त्यात ती या चित्रपटाला घेऊन फार उत्सुक असल्याचे सांगितले होते. सनी लिओनी या चित्रपटात एका योद्धाची भूमिका साकारत  आहे, त्यासाठी तिने घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण सुद्धा घेतले आहे. हा चित्रपट तेलगू तामिळ आणि मल्याळम या तीन भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. पोस स्टीफिन ह्या चित्रपटाचे निर्माते असून वदूवडियन हा चित्रपट दिग्दर्शित करत आहे. सनीने इमेज बदलण्यासाठी साउथकडे आपला मोर्चा वळविल्याची चर्चा रंगली आहे.इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार सनीने या चित्रपटासाठी 3.5 कोटीची मागणी केली होती. ही रक्कम अनुष्का घेतल असलेल्या मानधनापेक्षा जास्त आहे. अनुष्काला बाहुबलीच्या दोन चित्रपटामध्ये अभिनय करण्यासाठी प्रत्येकी 2.5 कोटी देण्यात आले होते. सुरुवातीला सनीने मागितलेली रक्कम खूप जास्त वाटली मात्र त्यानंतर ते यासाठी तयार झाले. हा चित्रपट एकूण चार भाषेमध्ये तयार करण्यात येणार आहे. तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदीमध्ये तयार करण्यात येणार आहे. ALSO READ :  सनी लिओनीचा हा ‘टायर’ व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!लवकरच सनीचा मेणाचा पुतळा दिल्लीच्या मॅडम तुसादमध्ये उभा राहणार आहे. मेणाचा पुतळा तयार करण्यासाठी सनीचे बरेचसे फोटो आणि शरीराचे २०० मेजरमेंट घेण्यात आले आहेत. कदाचित सनीची लोकप्रियता बघून हा पुतळा लावणात येणार आहे. ज्यावेळी ही माहिती सनीला समजली तेव्हा ती खूपच आनंदी झाली होती.