उषा काकडे यांनी प्रेरणादायी लघुपट " उड़ने दो " या चित्रपटात प्राध्यापक म्हणून अभिनेत्री रेव्हथी यांनी मुख्य भूमिका केली आहे. ग्रॅविटस फाऊंडेशनने चित्रपटाची निर्मिती केली असून, 'उडने दो' च्या दिग्दर्शक आरती एस बागडी यांनी दिग्दर्शन केले आहे. नुकतेच 'उडने दो'चा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी अमृता फडणवीस, डिझायनर मनीष मल्होत्रा , जरीन खान, लारा दत्ता उपस्थित होते.
गुड टच बैड टच च्या विषयावर आधारित हा लघुपट पालकांच्या डोळे उघडण्यास मदत करेल ज्यायोगे त्यांच्यामध्ये बाल शोषणाबद्दल जागरुकता निर्माण होईल.निर्भया आणि कश्मीरच्या मधील बलात्काराच्या प्रकरणांनंतर उषा काकडे यांनी ६०० सरकारी शाळांमध्ये गुड टच बैड टच चा प्रचार केला. आतापर्यंत कोणीही या कारणाविषयी बोलले नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले गेले पण , ग्रॅविटस फाऊंडेशन ने सामाजिक भान ठेवून ह्याचा योग्य प्रसार करण्याचे श्रेय दिले जाते.अमृता फडणवीस म्हणतात, " उड़ने डो एका महत्वाच्या आणि संवेदनशील विषयाशी निगडित आहे. ५ ते १२ वयोगटातील ५३ टक्के लहान मुलां वर लैंगिक अत्याचार होत आहे. त्यांना दुःख आणि छळाचा सामना करने म्हणजे एक भयंकर स्वप्न आहे , म्हणून जागरुकता निर्माण करणे खूप महत्वाचे आहे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशिवाय ही उड़ने दो ही है लघुपट सर्वोत्तम माध्यम आहे. "
अभिनेत्री रेवथी म्हणतात, "मी या चित्रपटासाठी आरतीची स्वातंत्र्य आणि मोकळेपनाने काम करू दिले त्या मुळे मि फाउंडेशनची खरोखर प्रशंसा करते . जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकली, तेव्हा मला वाटले हा लघुपट उत्कृष्ट बनला पाहिजे याबद्दल मी उत्सुक होते. मला वाटते की चित्रपट हा एक चांगला माध्यम आहे चांगली जागरूकता निर्माण करण्यास मदत करते.
डिझायनर मनीष मल्होत्रा म्हणतात, "माझा सुमारे तीन वर्षां पासून उषाजी सोबत परिचय आहे. त्या बर्याच वेगवेगळ्या विषयांवर काम करत आहेत . आपण काही वर्षांपूर्वी या कारणांविषयी बोलले पाहिजे होते जे आपण आता बोलत आहोत. आम्हाला आपल्या मुलांमध्ये सकारात्मकता, विश्वास आणि आशा उत्पन्न करण्याची गरज आहे आणि त्यांना 'गुड टच बॅड टच' बद्दल कळायला हवे, त्यासाठी पालकांनी जागरूक करने गरजेचे आहे . "