सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणातील ड्रग्ज अँगलने सुरु असलेल्या तपासासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण आजच्या चौकशीसाठी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणला शनिवारी सकाळी १० वाजता एनसीबी कार्यालयात पोचली होती. दीपिकामागोमाग अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरही एनसीबी कार्यालयात पोहचल्या. काल रकुल प्रीत सिंगची चौकशी करण्यात आली.
यादरम्यान तिने धर्मा प्रॉडक्शनचा असिस्टंट डिरेक्टर क्षितिज प्रसादचं नाव घेतलं. असेही सांगितले जात आहे की, रकुलप्रीतने ४ सेलिब्रिटींची नावे घेतली आहेत. ज्यांना क्षितिज ड्रग्स सप्लाय करत होता. त्यासोबत एनसीबीने क्षितिज प्रसादच्या घरी छापा मारून ड्रग्स ताब्यात घेतलं. यानंतर लगेच दिग्दर्शक-निर्माता करण जोहर याने यावर स्पष्टीकरण जारी केलं होतं.
एबीबी लाईव्हच्या रिपोर्टनुसार सारा अली खान आणि श्रद्धा कपूर दोघींनाही ड्रग्जसंबंधीच्या चॅटबद्दल अनेक प्रश्न विचारले. NCB च्या चौकशीत साराने 'केदारनाथ' सिनेमाच्या शूटिंगवेळी सुशांतला अनेकदा व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्स घेतल्याचे पाहिले असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. 2018 मध्ये केदारनाथ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आपण सुशांतबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचंही कबूली तिने दिली आहे.एवढंच नाही तर या शूटिंग संपल्यानंतर सुशांतच्या केप्री हाऊस इथल्या घरात त्याच्याबरोबर राहायलाही सारा गेली होती असेही तिने सांगितले.
सुशांतला कधी व्हॅनिटीमध्ये तर कधी सेटवर देखील ड्रग्ज घेताना पाहिल्याची श्रद्धानेही कबुली दिली आहे. 'छिछोरे'च्या सिनेमाच्या सक्सेस पार्टीमध्ये पवना फार्म हाऊसवर गेली होती तेव्हा त्या पार्टीमध्ये केवळ डान्स केला होता. यावेळी ड्रग्ज घेतले नव्हते असेही तिने सांगितले.
दीपिकाची करिष्मासोबत झालेल्या चौकशी एनसीबीने केलेल्या ड्रग चॅटच्या प्रश्नावर, दीपिकाने ते ड्रग चॅट तिचंच असल्याचं कबुली दिली आहे. अन्य प्रश्नांची उत्तरे देताना दीपिकाने टाळाटाळ केली NCB ला समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. मीडियाला टाळण्यासाठी दीपिकाने गेस्ट हाऊसजवळील एका पंचतारांकित हॉटेलची रूम बुक केली होती. हॉटेलमधूनच ती थेट गेस्ट हाउसला पोहोचली. त्या हॉटेलमध्ये ती रणवीर सिंगसोबत होती असून ती लीगल टीमशी सल्लामतलज देखील रात्री करत असल्याची माहिती समोर आली होती.
एनसीबीने धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितिज प्रसादची चौकशी केली आणि रात्री उशीरा त्याला ताब्यात घेतलं. यानंतर लगेच दिग्दर्शक-निर्माता करण जोहर याने यावर स्पष्टीकरण जारी केलं. एनसीबीच्या टीमने शुक्रवारी अभिनेत्री रकुलप्रीत सिंहला चौकशीसाठी बोलवलं होतं.