‘साहो’ आणि ‘छिछोरे’ असे एकापाठोपाठ एक सुपरहिट सिनेमे देणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या अनेक वर्षांपासून एका आजाराचा सामना करतेय. खुद्द श्रद्धाने ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला. गत 6 वर्षांपासून ती एंजायटीने पीडित असल्याचे तिने सांगितले.ती म्हणाली की, ‘एंजायटी हा आजार असतो, याबद्दल आधी मला काहाही ठाऊक नव्हते. ‘आशिकी 2’ या चित्रपटानंतर माझ्यात या आजाराची लक्षणे दिसू लागलीत. मला त्रास होत होता. पण अनेक तपासण्या करूनही मला काय झालेय, हे स्पष्ट झाले नव्हते. मला काय झालेय, हे डॉक्टरांनाही कळेना.
हे सगळेच विचित्र होते. मी वेदना सहन करत होते. पण या वेदना का व कशामुळे हे मला कळत नव्हते. यानंतर मी स्वत:च स्वत:ला हा प्रश्न विचारला आणि मला फिजिकल एंजायटीची जाणीव झाली. आजही मी या आजाराशी लढतेय. अर्थात स्थितीत बरीच सुधारणा झाली आहे. हा आजार तुमच्या आयुष्याचा भाग आहे, हे आधी स्वीकारणे गरजेचे आहे आणि नंतर त्याच्याशी अगदी प्रेमाने निपटण्याची गरज आहे. तुम्हाला हा आजार असेल वा नसेल. पण तुम्ही कोण आणि तुम्हाला काय करायचे आहे, हे तुमचे तुम्हाला माहित असायला हवे.’