Join us

दीपिका पादुकोणला मागे टाकत श्रद्धा कपूर बनली नंबर वन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 11:01 AM

गेले काही दिवसांपासून आपला आगामी सिनेमा 'स्त्री'च्यामुळे चर्चेत राहिलेली आशिकी गर्ल श्रध्दा कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनलेली आहे.

ठळक मुद्देइंस्टाग्रामवर श्रद्धा कपूर एक नंबरवर पोहोचली आहे. या स्पर्धेत श्रद्धाने दीपिका पादुकोणला मागे टाकलं आहे

गेले काही दिवसांपासून आपला आगामी सिनेमा 'स्त्री'च्यामुळे चर्चेत राहिलेली आशिकी गर्ल श्रध्दा कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनलेली आहे. असं पहिल्यांदा झालं असेल की, श्रद्धाने आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण सारख्या अभिनेत्रींना मागे टाकतं इन्स्टाग्रामवर नंबरवन स्थान पाटकावण्यात यश मिळवलं आहे.  अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

इंस्टाग्रामवर श्रद्धा १०० गुणांसह सर्वश्रेष्ठ बनली आहे. तर अलिया भट्ट ८५ गुणांसह दुस-या स्थानावर पोहोचली आहे. दीपिका पादुकोण ६८ गुणांमुळे तिस-यास्थानी तर प्रियांका चोप्रा ६६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. सोनम कपूर अहुजा ५९ गुणांसह  पाचव्या स्थानावर आहे.

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात की, "एका महिन्याच्या आत सातव्या स्थानावरून सरळ अग्रस्थानी पोहोचलेल्या  श्रद्धाने आपल्या बॉलिवूडमधल्या सर्व स्पर्धकांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. तिची वाटचाल नक्कीच  उल्लेखनीय म्हणायला हवी. राजकुमार राव सोबत फिल्म स्त्री आणि शाहिद कपूर सोबतची फिल्म बत्ती गुल मीटर चालू मूळे तिची बरीच पब्लिसिटी होतेय. ह्याच पब्लिसिटीनूसार श्रध्दाच्या इन्स्टा पोस्ट आणि इन्स्टा स्टोरीज असतात. त्यामुळेच तर  श्रध्दाच्या  इन्स्टाग्रामच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. "

अश्वनी कौल पुढे म्हणतात, "श्रध्दा  आपल्या कुटूंबासोबतचे फोटोही  पोस्ट करते.ज्यामूळे तिच्या लोकप्रियतेत वाढ होत असते. चार भारतीय भाषांमधील ६००हुन अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत पोहोचू शकतो.”

टॅग्स :श्रद्धा कपूरदीपिका पादुकोणइन्स्टाग्राम