Join us

श्रद्धाचं मराठमोळं प्रेम! वडापाव खाऊन अभिनेत्रीने सेलिब्रेट केला वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 11:29 AM

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरला महाराष्ट्रीयन पदार्थ प्रचंड आवडत असून ती कायम या पदार्थांवर ताव मारताना दिसते. विशेष म्हणजे तिच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुद्धा तिने वडापाव खाऊन केलं आहे.

बॉलिवूडची चुलबूली गर्ल अर्थात अभिनेत्री श्रद्धा कपूर ( shraddha kapoor) कायम तिच्या मस्तीखोर अंदाजामुळे चर्चेत येत असते. श्रद्धा आज तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. यामध्येच तिचा बर्थ डे सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या सेलिब्रेशन पार्टीमध्येही श्रद्धाचा फुडी अंदाज दिसून येत आहे.

श्रद्धा प्रचंड फुडी असल्याचं तिच्या चाहत्यांना चांगलंच ठावूक आहे. श्रद्धा कायम नवनवीन पदार्थ ट्राय करत असते. यात खासकरुन तिला महाराष्ट्रीयन पदार्थ जास्त आवडतात. विशेष म्हणजे श्रद्धाने तिचं बर्थ डे सेलिब्रेशन सुद्धा वडापाव खाऊनच केलं. सोशल मीडियावर तिच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये श्रद्धा पापाराझींसोबत तिचा बर्थ डे सेलिब्रेशन करत आहे. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा ब्लेझर परिधान केला होता.सोबतच तिने पापाराझींसोबत केक कट केला आणि त्यानंतर जिलबी, वडापाववर ताव मारला.

दरम्यान, श्रद्धाला प्रचंड फूडी असून तिला नवनवीन पदार्थ ट्राय करायला आवडतात. यात खासकरुन तिला महाराष्ट्रीयन पदार्थ आवडतात. श्रद्धा कायम इन्स्टाग्रामवर नवनवीन पदार्थ ट्राय करतानाचे व्हिडीओ, फोटो पोस्ट करत असते. श्रद्धा लवकरच राजकुमार रावसोबत 'स्त्री 2' मध्ये झळकणार आहे. त्यामुळे सध्या ती तिच्या या नव्या प्रोजेक्टमुळेही चर्चेत येत आहे.

टॅग्स :श्रद्धा कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा