Join us

बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 15:01 IST

फिल्मी कुटुंबातून येऊनही श्रद्धा कपूरला करावा लागला संघर्ष

बॉलिवूडची 'ब्लॉकबस्टर स्त्री' श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) चाहत्यांची लाडकी आहे. मराठमोळी थोडीशी साधीभोळी अशी ही पंजाबी कुडीही आहे. श्रद्धाला फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करुन १४ वर्ष झाली आहेत. यात तिने अनेक हिट सिनेमे दिले. काही फ्लॉपही झाले. पण म्हणावं तसं तिने अगदी बॅक टू बॅक सिनेमे केले नाहीत. नुकतंच तिला याबद्दल विचारलं असता तिने कारण सांगितलं आहे.

श्रद्धाने नुकतंच 'स्त्री 2' हा ब्लॉकबस्टर हिट दिला. याआधी तिचा 'तू झुठी मै मक्कार' गाजला होता. गेल्या काही वर्षात तिने अगदी मोजक्या सिनेमांमध्येच काम केलं आहे. याबद्दल श्रद्धा म्हणाली, "मला बॅक टू बॅक सिनेमे करण्याची अजिबातच घाई नाही. मला माझ्या इंट्युशनवर विश्वास आहे. जे मनाला पटतं तेच मी करते. आपल्या मनाचं ऐकलं तरच आपण जमिनीवर राहतो असं मला वाटतं."

ती पुढे म्हणाली, " माझा आतापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. अपयश यशाची पहिली पायरी असते.  सुरुवातीच्या काळात मी ऑडिशन्स दिल्या. तेव्हा  अनेकदा असं झालं की माझी एखाद्या सिनेमात निवड झाली पण नंतर ऐनवेळी मला रिप्लेस केलं. अशावेळी माझा आत्मविश्वासही खचला. पण याच अनुभवांमधून मी शिकले आणि इथपर्यंत पोहोचले."

श्रद्धा कपूर 'स्त्री' या हॉरर कॉमेडीमुळे जास्तच चर्चेत आली. ती सर्वांचीच फेवरिट स्त्री बनली. आता श्रद्धा आगामी कोणत्या सिनेमात दिसणार हे अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान हृतिक रोशनच्या 'वॉर 2' मध्ये श्रद्धाचं आयटम साँग असणार अशी चर्चा आहे. 

टॅग्स :श्रद्धा कपूरबॉलिवूड