Join us  

बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत श्रद्धा कपूर व्हॅकेशन करतेय एन्जॉय, फोटोंवरून सत्य आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 3:38 PM

श्रद्धा कपूर ही नेटकऱ्यांची खूप लाडकी आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. कोल्हापूरचे मराठी संस्कार जपत, कपूरांच्या घरची ही मराठमोळी लेक हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चा ठसा उमटवते आहे.  श्रद्धा कपूर ही नेटकऱ्यांची खूप लाडकी आहे. आपल्या सोशल मीडियावरुन ती मजेशीर कंटेंट शेअर करत असते.  श्रद्धा सध्या सुट्ट्यांचा आनंद घेतेय, मात्र तिथे ती फिरायला एकटी नाही तर तिचा बॉयफ्रेंड राहुल मोदी सोबत गेली आहे. त्या दोघांनी एकत्र अद्याप फोटो टाकले नसले तरी काही फोटोंनी त्यांची पोलखोल केली आहे.

श्रद्धा कपूर ही राहुल मोदीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनीही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलेलं नाही. पण, दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. काही दिवसांपुर्वी श्रद्धाच्या गळ्यात 'R' नावाचं लॉकेटही पाहायला मिळालं होतं. यातच आता ते दोघे एकत्र ट्रिप एन्जॉय करत आहेत.

 श्रद्धाने तिच्या ट्रीपचे काही फोटो शेअर केले होते. यातच राहुलची बहिण सोनिकाने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यात राहुल आणि  श्रद्धाच्या फोटोमधील बॅकग्राऊंड सारखंच असल्याचं नेटकऱ्यांच्या नजरेस पडलं. यावरुनच दोघे एकत्र ट्रिप एन्जॉय करत असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. 

राहुल मोदी बॉलिवूड चित्रपटांचा लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक आहे. श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'तू झुठी मै मक्कार' चित्रपटात रणबीर कपूरबरोबर तिने स्क्रीन शेअर केली होती. यातील तिची आणि रणबीर कपूरची जोडी खूपच पसंत केली गेली.  शिवाय, राजकुमार रावसोबत 'स्त्री २' या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. अमर कौशिक यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटात अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'स्त्री २' ऑगस्ट २०२४ मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 

टॅग्स :श्रद्धा कपूरसेलिब्रिटीबॉलिवूडसोशल मीडिया